BSF जवानांना मिळाली सँड स्कूटर; वाळवंटातील गस्त होणार वेगवान

सँड स्कूटर 4×4 गीअर पॉवरमध्ये 40 किमी प्रतितास वेगाने धावू शकते.
Sanad Scooter
Sanad Scooter Sakal

नवी दिल्ली : राजस्थानच्या परिसरात असलेल्या भारताच्या सीमेवर भारतीय जवानांकडून (Indian Army) उटांवर बसून गस्त घातली जाते. मात्र, आता वाळवंटी भागातील BSF चे जवानांनी उंटांवर (Camel) बसून गस्त घालण्याबरोबरच सँड स्कूटरवर बसून देऊन सीमाभागात गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. सीमा सुरक्षा दलाकडून राजस्थानच्या थार वाळवंटातील जैसलमेरच्या शाहगढ परिसरातील पाकिस्तान सीमेवर (Pakistan Border) या स्कूटरद्वारे गस्त घालण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अमेरिकन कंपनी पोलारिसची ही सँड स्कूटर 4×4 गीअर पॉवरमध्ये 40 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. अलीकडेच सीमा सुरक्षा दलाने ट्वीट करून या स्कूटरचे कौतुक केले आहे. (Sand Scooter For BSF Troops)

Sanad Scooter
'आधी बुलेट ट्रेन, समृद्धीवर चर्चा, आता...'; सदाभाऊंची मविआवर टीका

स्कूटरवर 4 ते 6 जवान

गस्तीसाठी जवानांना देण्यात येणाऱ्या या स्कूटरवर 4 ते 6 जवान सामान आणि शस्त्रे घेऊन फिरू शकतात. याशिवाय गाडीला देण्यात आलेल्या लाईटच्या तेजस्वी प्रकाशामुळे रात्रीच्या वेळीही गस्त घालणे सोयीच जाते. शिवाय या गाडीचा वेग ताशी 40 किमी आहे. त्यामुळे सीमाभागात घुसखोरी करणाऱ्या घुसखोरांचा पाठलाग करणे जवानांना सहज सोपे होणार आहे.

बीएसएफकडून ट्वीट

बीएसएफने याबाबत ट्वीट करत लिहिले आहे की, 'थार' च्या अथांग वाळवंटात भारत-पाकिस्तान सीमेवर बीएसएफच्या गस्तीचा वेग वाढवण्यास सँड स्कूटर मदतगार ठरत आहे. ही गाडी आल्यानंतर उंटांच्या सहाय्याने घालण्यात येणारी गस्त थांबवली आहे असे नसून, उलट उंट ही येथील जवानांच्या मूलभूत गरजांपैकी एक असल्याचे म्हटले आहे. परंतु धावणे आणि पाठलाग करण्यात उंट अपुरे असल्याचे सिद्ध होत आहे. मात्र, सँड स्कूटरच्या साहाय्याने हे काम अगदी कमी वेळात होत आहे.

Sanad Scooter
गॅसदरवाढीवर रुपाली ठोबरेंचं खोचक ट्विट, म्हणाल्या...

1966 मध्ये झाला बीएसएफमध्ये उंटांचा समावेश

भारत-पाकिस्तान सीमेवर वाळवंटात उंटांवर बसून गस्त घालण्यास 1966 मध्ये सुरुवात झाली. 1966 मध्ये उंटांना प्रशिक्षण देऊन बीएसएफकडे सुपूर्द करण्यात आले. तेव्हापासून आजतागायत वाळवंटातील दुर्गम भागात फक्त उंटांचा वापर सैनिकांच्या हालचाली आणि गस्त घालण्यासाठी केला जातो. मात्र सीमेवरील दुर्गम भागात, जिथे वाळवंटात चालणेही अवघड आहे, तिथे घुसखोरीच्या शक्यतेमुळे, भरधाव वेगाने धावून एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जाताना खूप त्रास होत होता. त्यानंतर 2015 मध्ये बीएसएफने या दुर्गम भागांसाठी पोलारिस या अमेरिकन कंपनीकडून 36-36 लाखांना 2 सँड स्कूटर खरेदी केल्या होत्या.

सीमेच्या सुरक्षेदरम्यान अत्यंत प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीत बीएसएफ जवानांना अडचणींचा सामना करावा लागतो, हे लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्था आणि गस्त सुधारण्यासाठी केंद्र सरकारने बीएसएफच्या सर्व भागात स्कूटर देण्याची कसरत २०१५ साली सुरू केली होती. प्रतिकूल परिस्थितीत सीमेवर जवानांसमोर नव्या आव्हानांचा सामना करत केंद्र सरकारने हा निर्णय घेतला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com