Jammu - Kashmir : अमित शाहांच्या दौऱ्यावेळी पोलीस महासंचालकाची हत्या

त्यांचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्नही आरोपीने केला आहे.
Hemant Lohiya
Hemant LohiyaSakal

जम्मू काश्मीरमध्ये काल रात्री उशिरा तुरुंग विभागाच्या पोलीस महासंचालकांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. यामुळे आता तिथल्या सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ माजली आहे. या हत्येच्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत, त्यामुळे सुरक्षा यंत्रणा आता अधिक सतर्क झाल्या आहेत.

पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांना त्यांच्या मदतनीसावर संशय आहे. कारण या घटनेनंतर तो फरार झाला आहे. लोहिया यांचा मृतदेह त्यांच्या शहराबाहेरच्या घरामध्ये आढळून आला आहे. त्यांच्या शरीरावर चाकूने वार केल्याचं पोलिसांना आढळून आलं आहे. लोहिया यांना ऑगस्ट महिन्यात पोलीस महासंचालक (तुरुंग प्रशासन) ही जबाबदारी देण्यात आली होती.

कसा झाला खून?

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, लोहिया यांच्या शरीरावर चाकूने वार करण्यात आल्याचं आढळून आलं आहे. लोहिया यांच्या पायाला तेल लावल्याचंही आढळून आलं आहे. त्यांचा पाय सुजला होता. आरोपीने लोहिया यांना गुदमरून मारलं, त्यानंतर सॉसच्या बाटलीच्या काचेने त्यांचा गळा चिरला आणि मग त्यांचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कालच आपल्या तीन दिवसीय जम्मू काश्मीर दौऱ्यावर आले आहे. त्याच दरम्यान ही घटना घडल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. अमित शाह माता वैष्णौदेवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. त्यानंतर राजौरी इथल्या एका सभेला संबोधित करतील. काही ठिकाणी विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com