जम्मू-काश्मीरमध्ये मोठी चकमक सुरू, पोलिसांनी लष्कर-ए-तौयबाच्या दहशतवाद्याला घेरलं

जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये सुरक्षा दलांनी मोठी कारवाई सुरू केलीय.
Jammu and Kashmir Budgam
Jammu and Kashmir Budgamesakal
Summary

जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये सुरक्षा दलांनी मोठी कारवाई सुरू केलीय.

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये (Jammu and Kashmir Budgam) सुरक्षा दलांनी मोठी कारवाई सुरू केलीय. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीदरम्यान तीन दहशतवाद्यांना पोलिसांनी घेरलं असून यात लष्कर-ए-तौयबाचा (टीआरएफ) दहशतवादी लतीफ राथेरचाही (Terrorist Lateef Rather) समावेश आहे.

काश्मीरचे एडीजीपी विजय कुमार (ADGP Vijay Kumar) म्हणाले, 'राहुल भट्ट आणि आमरीन भट्ट यांच्या हत्येसह अनेक निरपराध नागरिकांच्या हत्येत लतीफ राथेरचा हात होता. सध्या चकमक सुरू झाली असून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.'

Jammu and Kashmir Budgam
BJP : तेलंगणात भाजप नेत्याची आत्महत्या; घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir Police) सुरक्षा दलाचं ऑपरेशन ऑल आउट सुरूय. यामध्ये दहशतवाद्यांना लक्ष्य केलं जात आहे. आयजीपींच्या म्हणण्यानुसार, गेल्या 6 महिन्यांत सुरक्षा दलांनी 118 दहशतवाद्यांना ठार केलंय. या दहशतवाद्यांपैकी 77 दहशतवादी पाकिस्तान प्रायोजित लष्कर-ए-तौयबाचे सदस्य होते. 2021 मध्येही सुरक्षा दलांनी 55 दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. दोन-तीन महिन्यांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून काही हत्या केल्या होत्या. यानंतर सुरक्षा दलांनी या दहशतवाद्यांविरोधातील कारवाई तीव्र केलीय.

Jammu and Kashmir Budgam
धक्कादायक! कर्नाटकात गायींसोबत नराधमाचे अनैसर्गिक कृत्य, आरोपीला अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com