जम्मु काश्‍मीर: सोपोरमध्ये चकमक; दोन दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

दहशतवाद्यांच्या शोधार्थ सुरक्षा दलांकडून मोठी शोधमोहिम राबविण्यात येत असतानाच त्यांच्याकडून अचानक गोळीबार केला. सुरक्षा दलांकडूनही या आगळिकीस त्वरित प्रत्युत्तर देण्यात आले. घटनास्थळी अद्यापी किमान दोन दहशतवादी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

श्रीनगर - जम्मु काश्‍मीर राज्यातील सोपोर शहरातील शंगरगुंड भागामध्ये झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केल्याचे वृत्त आज (सोमवार) सूत्रांनी दिले.

या भागात दहशतवादी दडल्याची माहिती मिळाली असून या ठिकाणी तुंबळ चकमक सुरु झाली आहे. दहशतवाद्यांच्या शोधार्थ सुरक्षा दलांकडून मोठी शोधमोहिम राबविण्यात येत असतानाच त्यांच्याकडून अचानक गोळीबार केला. सुरक्षा दलांकडूनही या आगळिकीस त्वरित प्रत्युत्तर देण्यात आले. घटनास्थळी अद्यापी किमान दोन दहशतवादी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

या चकमकीत सुरक्षा दलांपैकी कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
सरकारी थकबाकीदार सत्यपाल सिंह मंत्रिमंडळात 
दुर्दैवी अनिता अन्‌ तमीळ अस्मिता...!
धुळे जिल्ह्यात 351 वर्गखोल्या धोकादायक
एकाच कुटूंबातील 3 भावंडांचा तलावात बुडून मृत्यू
मानाच्या बाप्पांचे यंदाही हौदांमध्ये विसर्जन
भाविकांच्या गर्दीने रस्ते दिसेनासे झाले
'व्हेंटिलेटर' आणि 'हाफ तिकीट' सर्वोत्कृष्ट चित्रपट

Web Title: jammu kashmir indian army terrorists