Jammu Kashmir Poonch Blast
esakal
जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (LoC) मोठा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. कृष्णा घाटी सेक्टरमधील सतवाल-नाकी परिसरात झालेल्या या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ कमांडर मोहम्मद फैजान याचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.