
Pahalgam Terror Attack Helper Arrested
ESakal
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. दक्षिण काश्मीरचा रहिवासी मोहम्मद युसूफ कटारिया असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याने २२ एप्रिल रोजी लष्कर-ए-तैयबा दहशतवाद्यांना मदत केली होती. श्रीनगर पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले आणि त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.