जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Jantar Mantar दिल्लीत जंतर मंतरवर आता आंदोलन करता येणार नाही. दिल्ली पोलिसांनी त्याऐवजी ३ ठिकाणांचे पर्याय दिले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.
Jantar Mantar

Jantar Mantar

Esakal

Updated on: 

दिल्लीत आंदोलनासाठी प्रसिद्ध असणारं जंतर मंतर आता आंदोलनासाठी वापरता येणार नाही. दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. जंतर मंतर ऐवजी आंदोलन आणि निदर्शनांसाठी रामलीला मैदान, बुऱ्हाडी मैदान आणि पूर्व दिल्लीतील सीबीडी मैदान असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारसीनुसार दिल्ली पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com