जवानांनी बनवला कर्नलचा 'तो' व्हिडिओ अन्...

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

कार्यालयात महिलेसोबत शरीरसंबंध ठेवणाऱ्या कर्नलचा व्हिडीओ समोर आला असून, याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दोन जवानांनी हा व्हिडिओ कैद केला आहे.

चंदीगड: कार्यालयात महिलेसोबत शरीरसंबंध ठेवणाऱ्या कर्नलचा व्हिडीओ समोर आला असून, याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दोन जवानांनी हा व्हिडिओ कैद केला आहे.

विवाहानंतर पाचव्याच दिवशी महिलेचे जुळले सुत अन्...

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पंजाबमधील अबोहारमध्ये हा प्रकार घडला आहे. व्हिडिओमधील महिला सैन्यातील नसून, ती नागरी सेवा क्षेत्रात नोकरी करते. कर्नलने कार्यालयामध्येच महिलेसोबत नको ते कृत्य करण्यास सुरवात केल्यानंतर दोन जवांनानी ते कैद केले. २५ राजपूताना रायफल्सच्या दोन जवानांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून कळवल्यानंतर, या प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित कर्नल आता सेवेतून निवृत्त झाला आहे.

विमानाने येऊन प्रेयसीला चॉकटेल देत लगावली थप्पड...

दरम्यान, कर्नल सेवेत असताना वाईट वागणूक देत होता. त्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी व्हिडिओ कैद केल्याचे जवानांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. कर्नला आता लष्करी सेवेतून निवृत्त झाला असला तरी, लष्कराच्या नियमानुसार त्याला चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. शिवाय, या दोन जवानांनी कर्नलचे ब्लॅकमेलिंग केले आहे का, याचा सुद्दा तपास केला जाईल.

फोटोतील 40 जाहिराती ओळखा अन् मिळवा बक्षीस...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jawans film Colonel at office with women probe ordered

टॅग्स
टॉपिकस