विमानाने येऊन प्रेयसीला चॉकटेल देत लगावली थप्पड...

वृत्तसंस्था
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

प्रियकर चॉकलेट डे निमित्त प्रेयसीला चॉकटेल देण्यासाठी दिल्लीहून पाटना येथे आला. प्रेयसीला भेटल्यानंतर तिला चॉकलेट दिले. मात्र, काही वेळातच त्याने जोरदार थप्पड लगावली. प्रेयसीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पाटना (बिहार): प्रियकर चॉकलेट डे निमित्त प्रेयसीला चॉकटेल देण्यासाठी दिल्लीहून पाटना येथे आला. प्रेयसीला भेटल्यानंतर तिला चॉकलेट दिले. मात्र, काही वेळातच त्याने जोरदार थप्पड लगावली. प्रेयसीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

अलविदा दुनिया, हमेशा के लिए...

प्रियकर व प्रेयसी दोघेही एकाच शहरातील. पण, प्रियकर सध्या कामानानिमित्त दिल्लीला राहात आहे. चॉकलेट डे निमित्त आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी रविवारी (ता. 9) तो विमानाने शहरामध्ये आला. प्रियकर भेटण्यासाठी आल्यामुळे ती खूष होती. दोघांनी भेटायचे ठरवले. ठरलेल्या ठिकाणी दोघे आल्यानंतर आनंदात होते. प्रेयसीची मैत्रिणही तिच्या सोबत आली होती. परंतु, ती दुसरीकडे बसली होते. प्रियकराने तिला चॉकलेट भेट दिले. दोघे आनंदात गप्पा मारत बसले होते. काही वेळानंतर प्रियकराने तिच्या मोबाईलला हात लावला. त्यामुळे प्रेयसी चिडली. तिने त्याच्या हातामधून मोबाईल काढून घेतला.

प्रियकर म्हणाला प्रेयसीला दुध प्यायचा का अन्...

मोबाईलमध्ये असे काय आहे? असे प्रियकर विचारू लागला. काही वेळानंतर प्रियकराने पुन्हा मोबाईल घेतला. तिने हिसकावून घेतल्यानंतर प्रियकराने जोरदार थप्पड लगावली. शिवाय, मोबाईल फेकून दिला. यामुळे दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. प्रेयसीने मैत्रिणीच्या मोबाईलवरून पोलिसांकडे तक्रार केली. काही वेळातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

तुझ्यावर खूप प्रेम करतोय; हो बोल म्हणाला अन्....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boyfriend arrived patna from delhi to celebrate chocolate day with girlfriend at bihar