Upendra Kushwaha : मला लॉलीपॉप नकोय, माझा वाटा मला हवाय; JDU नेत्याचा नितीश कुमारांवर पुन्हा हल्ला

'मला अशा पदांचा लोभ नाही. मी याआधी केंद्रीय मंत्रीपद सोडलं होतं.'
Upendra Kushwaha vs Nitish Kumar
Upendra Kushwaha vs Nitish Kumaresakal
Summary

कुशवाहांच्या आरोपावर नितीश कुमार काय उत्तर देतात हे पहावं लागणार आहे.

Upendra Kushwaha vs Nitish Kumar : जनता दल युनायटेडचे (JDU) नेते उपेंद्र कुशवाह (Upendra Kushwaha) यांनी पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधलाय. राजकीय वादानंतर कुशवाह यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात रणशिंग फुंकलंय.

त्यांना विधानपरिषदेचा सदस्य करून लॉलीपॉप देण्यात आलं, असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र मला लॉलीपॉप नको, मला माझा वाटा हवाय, असं त्यांनी सांगितलं. कुशवाह म्हणाले, 'मला अशा पदांचा लोभ नाही. मी याआधी केंद्रीय मंत्रीपद सोडलं होतं. स्वतः नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी 1994 मध्ये लालू यादव (Lalu Yadav) यांच्याकडं वाटा मागितला होता, तसाच वाट मलाही हवा आहे.'

Upendra Kushwaha vs Nitish Kumar
Kasba Election : कसबा विधानसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट; भाजपनं मविआसह सर्वच पक्षांना केलं 'हे' आवाहन

नितीश कुमार म्हणतात की, जेडीयूमध्ये आल्यानंतर मला खूप आदर दिला गेला. पण, मला पार्लमेंटरी बोर्डाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. मी संसदीय मंडळाचा अध्यक्ष झालो. त्यानंतर जेडीयूच्या घटनेत दुरुस्ती करण्यात आली. मला संसदीय मंडळाचा सदस्य होण्याचा अधिकार मिळाला नाही. निवडणुकीतील उमेदवार निवडीबाबत माझ्याकडून कोणतीही सूचना घेण्यात आली नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. कुशवाहांच्या आरोपावर नितीश कुमार काय उत्तर देतात हे पहावं लागणार आहे.

Upendra Kushwaha vs Nitish Kumar
Sri Lanka : कोणालाच घाबरत नाही म्हणत माजी राष्ट्रपतींची मोठी घोषणा; 'ही' निवडणूक लढण्याचा केला निर्धार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com