Kasba Election : कसबा विधानसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट; भाजपनं मविआसह सर्वच पक्षांना केलं 'हे' आवाहन

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनामुळं पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
Kasba Assembly Constituency By-Election
Kasba Assembly Constituency By-Electionesakal
Summary

कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असं आवाहन भाजपकडून सर्व पक्षांना करण्यात आलंय.

Kasba Assembly Constituency By-Election : पुणे शहरातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार उतरवला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.

याबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडं तशी मागणीही केली आहे, त्यामुळं या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच आता कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असं आवाहन भाजपकडून सर्व पक्षांना करण्यात आलंय.

Kasba Assembly Constituency By-Election
Rahul Gandhi : 'लोग आते गए और कारवां बनता गया'; राहुल गांधींसाठी काँग्रेसच्या बड्या नेत्याची खास पोस्ट

भाजपच्या वतीनं माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांना पत्र देण्याची जबाबदारी पक्षानं दिली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असं आवाहन शहर भाजपच्या वतीनं (BJP) राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले (Nanasaheb Patole), महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि पुण्यातील सर्व पक्षांच्या शहराध्यक्षांना पत्र लिहून निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आलीये.

Kasba Assembly Constituency By-Election
CD Case : काँग्रेस प्रदेशाध्यक्षानं 'ती' सीडी बाहेर काढून माझं आयुष्य बरबाद केलं; भाजप नेत्याचा गंभीर आरोप

देशाच्या राजकारणात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं अनन्यसाधारण महत्व आहे. विकासकामात राजकारण केलं जात नाही. सर्व पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते एकमेकांशी उत्तम प्रकारचे संबंध प्रस्थापित करतात. तसंच लोकप्रतिनिधीच्या निधनासारख्या दुःखद घटनेनंतर सर्वसंमतीनं पोटनिवडणूक बिनविरोध होते. ही परंपरा कायम राखीत कसबा मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध करावी, अशी विनंती भाजपनं पत्राव्दारे सर्व पक्षांना केली आहे.

Kasba Assembly Constituency By-Election
Budget Session : 'मोदी सरकारमुळं गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळालं'; वाचा राष्ट्रपतींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे

बिनविरोध निवडणूक करणं हीच मुक्ताताईंना खरी श्रद्धांजली ठरेल, असंही पत्रात नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनामुळं पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या मतदारसंघात 26 फेब्रुवारीला मतदान होणार असून 2 मार्चला निकाल लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com