'एनआरसी'वरून भाजपला मोठा धक्का; नितीश कुमार म्हणाले बिहारमध्ये...

वृत्तसंस्था
रविवार, 15 डिसेंबर 2019

नव्या कायद्याच्या अंमलबजावणीस पंजाब, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्‍चिम बंगाल आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांनी नकार दिल्याची आठवण नितीशकुमार यांना करून देताना आता इतरांनीही आपल्या भूमिका स्पष्ट कराव्यात, असे किशोर यांनी म्हटले होते.

पाटणा : राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या (एनआरसी) मुद्यावरून संयुक्त जनला दलाचे (जेडीयू) उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी पक्षाचे अध्यक्ष नितीशकुमार हे याच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पहिल्यांदाच भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जेडीयूकडून हा मोठा झटका मानण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नव्या कायद्याच्या अंमलबजावणीस पंजाब, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्‍चिम बंगाल आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांनी नकार दिल्याची आठवण नितीशकुमार यांना करून देताना आता इतरांनीही आपल्या भूमिका स्पष्ट कराव्यात, असे किशोर यांनी म्हटले होते. यासंदर्भात त्यांनी शनिवारी रात्री नितीश कुमार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी सांगितले, की जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार या कायद्याच्या विरोधात आहेत. एनआरसी आणि कॅब हे दोन्ही एकाचवेळी लागू होऊ शकत नाहीत. 

अमितभाई 'मातोश्री'वर जाणार होते; देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा
 
नागरिकत्व सुधारणा विधेयकास (कॅब) संसदेत पाठिंबा देण्याच्या जेडीयूच्या निर्णयावरही किशोर यांनी टीका केली होती. स्वतःच्याच पक्षावर टीका करणाऱ्या किशोर यांनी नितीशकुमार यांच्यावर हल्लाबोल केला. भारताच्या आत्म्याचे रक्षण करण्याची जबाबदारी न्यायालयानंतर देशातील सोळा बिगरभाजप राज्यांच्या मुख्यमंत्र्यांवर आहे, असे किशोर यांनी म्हटले होते. अखेर एनआरसीवरून नितीश कुमार यांचे मन वळविण्यात त्यांना यश आल्याचे दिसत आहे. 

देशभरात वाहनांसाठी आजपासून फास्टटॅग अनिवार्य, कारण...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: JDU Support Central Government On CAB But Says No To NRC After Nitish Kumar Prashant Kishor