esakal | JEE 2021 : मुख्य परीक्षेच्या तिसऱ्या, चौथ्या सत्रांच्या तारखा जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

JEE Main

JEE मुख्य परीक्षेच्या तिसऱ्या, चौथ्या सत्रांच्या तारखा जाहीर

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : JEE मुख्य परीक्षेच्या तिसऱ्या आणि चौथ्या सत्रांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी मंगळवारी याची घोषणा केली. त्यानुसार, जेईई मुख्य परीक्षेचं तिसरं सत्र २० जुलै ते २५ जुलै दरम्यान तर चौथं सत्र २७ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान होणार आहे. (jee main exam dates jee mains ramesh pokhriyal exam)

पोखरियाल यांच्या माहितीनुसार, "जर एखाद्या विद्यार्थ्यानं यापूर्वी तिसऱ्या आणि चौथ्या सत्रासाठी अर्ज केला नसेल तर त्याला आता अर्ज करण्यासाठी संधी देण्यात येणार आहे. त्यानुसार, तिसऱ्या सत्रातील परीक्षेसाठी ६ जुलै ते ८ जुलै पर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच चौथ्या सत्रातील परीक्षेसाठी ९ जुलै ते १२ जुलैदरम्यान अर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर या दोन्ही सत्रांसाठी विद्यार्थ्यांना आपलं परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा ही असणार आहे." सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचं परीक्षा केंद्र उपलब्ध व्हावं यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे, असंही पोखरीयाल यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचं पालन करता यावं यासाठी आम्ही परीक्षा केंद्रांच्या संख्येतही वाढ केली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा: केंद्रीय संस्थाचा वापर करुन विरोधकांंचं दबावतंत्र - उद्धव ठाकरे

या परीक्षेच्या तिसऱ्या सत्रासाठी ६.८० लाख आणि चौथ्या सत्रासाठी ६.०९ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सुरुवातीला देशातील २३२ शहरांमध्ये ही परीक्षा होणार होती. पण आता ती ३३४ शहरांमध्ये होणार आहे. या परीक्षेच्या प्रत्येक शिफ्टमध्ये परीक्षा केंद्रांची संख्या ६६० हून ८२८ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

हेही वाचा: युक्रेनमध्ये महिला जवानांची बुटं का ठरलीयत वादग्रस्त?

दरम्यान, एनटीएने यावर्षापासून जेईई मेनची परीक्षा चार सत्रांमध्ये आयोजित करण्याची घोषणा केली होती. ज्यांपैकी दोन सत्रांची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च २०२१ मध्ये पार पडली. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या सत्रातील परीक्षा एप्रिल आणि मे महिन्यात होणार होती. मात्र, कोरोनाच्या उद्रेकामुळं ती पुढे ढकलण्यात आली होती.

परीक्षेसाठी नव्या कोरोना गाईडलाईन्स

नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (NTA) यासंदर्भात एक नोटीस जाहीर करत परीक्षा केंद्रांमध्ये सोशल डिस्टंसिंगसह कोविडच्या गाईडलाईन्सची संपूर्ण योजना तयार केली आहे.

  1. परीक्षेच्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला एक मास्क दिला जाणार आहे.

  2. एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या गेटवर एकत्र येऊ नयेत यासाठी त्यांना वेगवेगळ्या वेळा देण्यात आल्या आहेत.

  3. ज्या कॉम्प्युटरवर विद्यार्थी परीक्षा देईल तो कॉम्प्युटर पुढील परीक्षेसाठी वापरला जाणार नाही.

  4. डेस्क, खुर्ची, परीक्षा हॉल याला वारंवार सॅनिटाइज केलं जाणार आहे. त्याचबरोबर परीक्षा हॉलमध्ये हवा खेळती राहिल याची काळजी घेतली जाणार आहे.

loading image