धक्कादायक ! बाजारातून घरी चाललेल्या महिलेवर पतीसमोरच 17 जणांकडून सामूहिक बलात्कार

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 10 December 2020

पाच मुलांची आई असलेली पीडित महिला आपल्या पतीबरोबर आठवडा बाजारातून परतत होती. त्याच गावात जत्रेचेही आयोजन करण्यात आले होते.

दुमका- झारखंडमधील दुमका जिल्ह्यात खळबळजनक घटना घडली आहे. पतीबरोबर बाजाराला गेलेल्या पाच मुलांच्या आईवर सामूहिक बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. पीडित महिला पतीबरोबर आठवडा बाजारावरुन घरी चालली होती. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरु केल्याची माहिती पोलिस उपमहानिरीक्षक सुदर्शन प्रसाद मंडल यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. पतीसमोरचा महिलेवर बलात्कार केल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुमका मुफस्सिल ठाणे क्षेत्रात पाच मुलांची आई असलेली पीडित महिला आपल्या पतीबरोबर आठवडा बाजारातून परतत होती. त्याच गावात जत्रेचेही आयोजन करण्यात आले होते. रात्री उशिरा परतत असताना काही टवाळखोरांनी तिच्या पतीला पकडले आणि महिलेवर सामूहिक बलात्कार केला. बुधवारी सकाळी पीडित महिलेने आपल्या पतीबरोबर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. 

हेही वाचा- ब्रिटनच्या संसदेत शेतकरी आंदोलनाचा मुद्दा; PM जॉन्सन यांचं धक्कादायक उत्तर

पीडितेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, गावात दर मंगळवारी बाजार भरतो. खरेदीसाठी तो पत्नीला घेऊन तिथे गेला होता. रात्री 8 वाजता खरेदी करुन बाजारातून घरी जात असताना रस्त्यात दारुच्या नशेत धुंद असलेले सुमारे 17 मुले उभे होते. त्यातील पाच मुलांनी पतीला पकडले. उरलेल्या मुलांनी पत्नीला बाजूच्या झाडाआड नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. 

आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरु असून पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पीडितेच्या जबाबानुसार या घटनेत 17 आरोपींचा समावेश आहे. त्यातील एका आरोपीला पीडित महिला ओळखते, तो त्याच गावचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येते, अशी माहिती उपमहानिरीक्षक सुदर्शन प्रसाद मंडल यांनी सांगितले. 

हेही वाचा- जगातील 7 सर्वोत्तम पार्लमेंट; सौंदर्य पाहून व्हाल थक्क


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jharkhand A 35 year old woman was allegedly assaulting by 17 men in Dumka