
सदर मुलगी ७ जूनला सकाळी १० वाजल्यानंतर बेपत्ता झाली होती, अशी माहिती मुलीच्या नातेवाईकांनी दिली. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार ८ जूनला मुलीच्या कुटुंबीयांनी दाखल केली होती.
रांची : झारखंडच्या पलामू जिल्ह्यात एक भयानक घटना घडली. पलामू जिल्ह्यातील लालीमती जंगलात बुधवारी (ता.९) एका १६ वर्षीय मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळला. हत्येनंतर या अल्पवयीन मुलीचा एक डोळा फोडून तिचे शरीर झाडावर टांगण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली असून पुढील तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी ही स्थानिक भाजप नेत्याची मुलगी होती. पांकी पोलिस स्टेशन परिसरातील बुधबार गावात ती कुटुंबीयासोबत राहत होती आणि दहावीत शिकत होती. बुधवारी संध्याकाळी सदर मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती आहे. तिला पाच भावंडे असून ती सर्वात मोठी होती. (Jharkhand BJP leader's daughter found hanging from tree with eye gouged out)
तपासणी दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून एक मोबाईल फोन जप्त केला असून त्याच्या कॉल डिटेलच्या आधारे आरोपीला अटक केली. प्रदीपकुमारसिंग धानुक (वय २३) असे त्याचे नाव आहे. प्रदीप कुमारचे लग्न झाले असून त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर मुलगी ७ जूनला सकाळी १० वाजल्यानंतर बेपत्ता झाली होती, अशी माहिती मुलीच्या नातेवाईकांनी दिली. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार ८ जूनला मुलीच्या कुटुंबीयांनी दाखल केली होती. पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केल्यानंतर एका झाडाला तिचा मृतदेह लटकवलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेह कापडाने बांधून झाडाला टांगण्यात आला होता. तसेच तिचा उजवा डोळा फोडलेला होता. पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच सविस्तर माहिती मिळेल, अशी माहिती पांकी पोलिस स्टेशनचे एसआय अशोक कुमार यांनी दिली.
हत्येपूर्वी आरोपींनी अल्पवयीन मुलीला बेदम मारहाण केली होती. अल्पवयीन मुलगी बेपत्ता होण्याआधी काही दिवस आरोपी आणि पीडितेच्या कुटुंबामध्ये भांडण झाले होते. त्यातून हा प्रकार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. झारखंडचे भाजप प्रवक्ते प्रतुल सहदेव यांनी या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
(Edited by : Ashish N. Kadam)
देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.