झारखंड निवडणूक : धोनीच्या मतदारसंघात कुणी मारली बाजी?

वृत्तसंस्था
Monday, 23 December 2019

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, झारखंडमध्ये 65.17 टक्के मतदान झाले. 2014 च्या निवडणुकीत 66.53 टक्के मतदान झाले होते.

रांची : Jharkhand Assembly Election 2019 : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) या दोन कायद्यांच्या विरोधात देशभरात आंदोलनं सुरू झाली. आणि नेमकं त्याचं वेळेस झारखंड राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. त्यामुळे या आंदोलनाचा फटका निवडणूक निकालावर होणार हे निश्चित होतं. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भाजपला धोबीपछाड देत काँग्रेसने बहुमत गाठलं असल्याने गेल्या पाच वर्षांपासून सत्ता उपभोगणाऱ्या भाजपला झारखंडमध्ये पराभवास सामोरं जावं लागलं. या निवडणुकीत काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे उमेदवार सरस ठरले. 

यामध्ये झारखंड राज्याची राजधानी असलेल्या रांची या मतदारसंघाची जोरदार चर्चा झाली होती. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा येथील रहिवासी असल्याने रांचीतील प्रत्येक लोकल गोष्ट ग्लोबल होते.  त्यामुळे धोनीच्या मतदारसंघात कोणी बाजी मारली, याची चर्चा सुरू आहे. 

- शेतकऱ्यांनो वाचा : एक भाऊ एमबीए, एक इंजिनीअर, शेतीतून कमावतात 15 कोटी!

राज्यात सगळीकडे मात खात असणारा भाजप धोनीच्या मतदारसंघात मात्र सरस ठरला आहे. या मतदारसंघात 17 जागांसाठी मतदानप्रक्रिया पार पडली. येथील भाजप उमेदवार चंद्रेश्वर प्रसाद सिंह यांना 44,933 मतं मिळाली आहेत, तर झारखंड मुक्ती मोर्चाचे महुआ माजी यांना 22,571 मतं मिळाली आहेत. चंद्रेश्वर सिंह हे 22 हजार मतांनी आघाडीवर असल्याने त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे.

- भाजपच्या 'या' खासदाराविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, झारखंडमध्ये 65.17 टक्के मतदान झाले. 2014 च्या निवडणुकीत 66.53 टक्के मतदान झाले होते. त्यावेळी भाजपनं 37 जागा जिंकल्या होत्या. यंदा मतदानाच्या टक्केवारीत 1 टक्का घट झाली असली तरी त्याचा मोठा परिणाम निकालावर होतो. 

- उद्याच होणार मंत्रिमंडळ विस्तार?; कोणाला मिळणार संधी

तत्पूर्वी, झारखंडमध्ये 30 नोव्हेंबर ते 20 डिसेंबरदरम्यान एकूण पाच टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जास्त जागा मिळाल्यानंतरही भाजपला सत्तेबाहेर बसावे लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपसाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. तसेच काँग्रेसनेही जोरदार प्रचार केला होता. भारताचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीने आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jharkhand election results of Ranchi constituency where MS Dhoni lived