

Jharkhand Maiya Samman Yojana
sakal
झारखंड : दिवाळी आणि छठ महापर्वाच्या पार्श्वभूमीवर झारखंड सरकारने मुख्यमंत्री मंईयां सन्मान योजनेच्या लाभार्थी महिलांना आर्थिक दिलासा दिला आहे. या योजनेअंतर्गत ऑक्टोबर २०२६ महिन्याचा प्रत्येकी २ हजार ५०० रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यास सुरुवात झाली आहे. गढवा जिल्ह्यातील २ लाख २२ हजार ३२७ महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येणाऱ्या या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवणे हा आहे. सणासुदीच्या काळात हप्ता मिळाल्यामुळे महिलांना घरगुती गरजा, सणांची खरेदी आणि कुटुंबाच्या इतर खर्चासाठी मदत होणार आहे.