

Sudivya Kumar Death: Chest Pain Ignored Before Cardiac Arrest
Esakal
झारखंडचे मंत्री आणि गिरिडीहचे आमदार सुदिव्य कुमार यांचं मध्यरात्री हृदयविकाराने निधन झालं. त्यांनी गिरिडीहमधल्या मर्सी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मुख्यमंत्री हेमंत सोरेन सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी येण्याची शक्यता आहे. मंत्री सुदिव्य कुमार यांच्या निधनानंतर अनेक आमदार, माजी आमदार, अधिकारी, नेते आणि कार्यकर्ते रुग्णालय परिसरात दाखल झाले आहेत. यामुळे रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली आहे.