Jharkhand Protest : JPSC-JSSC वाद पेटला, आंदोलक विद्यार्थी तारेचे कुंपण भेदून विधानसभेसमोर पोहोचले, पोलिसांकडून लाठीचार्ज

JPSC Exam Irregularities : सरकारने ९८% मागण्या मान्य केल्याचा दावा केला, मात्र JSSC-CGL परीक्षा आणि CBI चौकशीवर निर्णय नाही. JPSC चे तीन सदस्य आणि अध्यक्षांनी राजीनामे दिल्याने मोठा प्रशासकीय बदल झाला.
Students clash with police during a massive protest in Ranchi

Students clash with police during a massive protest in Ranchi

esakal

Updated on

Massive Student Protest Erupts in Ranchi Over Exam Irregularities : झारखंडच्या राजधानी रांचीत जेपीएससी आणि जेएसएससी भरती परीक्षांमधील अनियमिततेच्या निषेधार्थ हजारो विद्यार्थी विधानसभेच्या परिसरात जमले आहेत. विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन सुरू केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. आंदोलकांनी पाण्याच्या बाटल्या आणि चपला फेकून प्रतिक्रिया व्यक्त केली. पोलिसांनी काटेरी तारांचे अडथळे उभारून आणि पाण्याचे फवारे मारून विद्यार्थ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही विद्यार्थी अडथळ्यांवर चढून नाचताना दिसले. विधानसभेभोवती सहा स्तरांची सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com