बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांसह कुटुंबातील १८ जणांना कोरोनाची लागण

काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी आणि कुटुंबातील काही सदस्यांना सर्दी आणि ताप येत होता
Jeetanram Manjhi
Jeetanram ManjhiJeetanram Manjhi

बिहारमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातला आहे. माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे (हम) राष्ट्रीय अध्यक्ष जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi) यांना सोमवारी कोरोनाची लागण झाली. माजी मुख्यमंत्र्यांसोबत पत्नी शांती देवी, मुलगी पुष्पा आणि सून दीपा तसेच कुटुंबातील १८ जणांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह (Corona report positive) आला आहे.

हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे राष्ट्रीय प्रवक्ते दानिश रिझवान यांनी सोमवारी सांगितले की, काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी आणि कुटुंबातील काही सदस्यांना सर्दी आणि ताप येत होता. या पार्श्वभूमीवर कोरोनाची तपासणी करण्यात आली. तपासात जीतन राम मांझी, त्यांची पत्नी, मुलगी आणि सून तसेच आपत्कालीन सचिव गणेश पंडित आणि त्यांच्या सुरक्षेत कार्यरत असलेले कर्मचारी यांच्यासह कुटुंबातील १८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे (Corona report positive) आढळून आले आहे.

Jeetanram Manjhi
आजीचे अवैध संबंध; अडसर ठरणाऱ्या ३ वर्षीय नातीची हत्या

गया जिल्ह्यातील जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi) यांचे वडिलोपार्जित निवासस्थान असलेल्या महाकर येथे हे सर्वजण विलगीकरणात आहेत. त्यांना कोणतीही समस्या नाही आणि सर्व सुरक्षित आहेत, असेही दानिश रिझवान यांनी सांगितले.

जनता दरबारात १४ कोरोना पॉझिटिव्ह

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दरबारात १४ कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये सहा तक्रारदार, जेवण बनवण्यासाठी आलेले पाच हॉटेल कर्मचारी आणि तीन शिपाई यांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना संसर्ग झाल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. हे लक्षात घेण्यासारखे आहे की जनतेच्या न्यायालयात मुख्यमंत्र्यांकडे जाण्यापूर्वी तक्रारदारांची कोरोना चाचणी केली जाते.

Jeetanram Manjhi
कोरोना वाढतोय, शाळांबाबत निर्णय नाहीच; सीबीएसई शाळा उद्यापासून

कोरोनाचा वेग पाचपट वाढला

बिहारमध्ये पाच दिवसांत कोरोनाचा वेग पाच पट वाढला आहे. २९ डिसेंबर रोजी राज्यात कोविडचे ७७ रुग्ण आढळले होते. दोन जानेवारी रोजी राज्यात ३५० हून अधिक लोकांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. बिहारमध्ये २९ डिसेंबरला ७७ जणांना कोरोनाची लागण झाली होती. दुसऱ्याच दिवशी ३० डिसेंबरला १३२ नवीन रुग्ण आढळले. १ जानेवारीला रुग्णांची संख्या २८१ वर पोहोचली. अशाप्रकारे पाच दिवसांत नवीन रुग्ण दिसण्याचा वेग जवळपास पाचपट वाढला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com