JNU Violence : 'जेएनयू'मध्ये गुंडांचा धुडगूस; विद्यार्थी, शिक्षकांना रॉडने मारहाण

वृत्तसंस्था
रविवार, 5 जानेवारी 2020

विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोष हिच्यासह अठरा जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये (जेएनयू) आज रात्री पुन्हा एकदा हिंसाचाराचा भडका उडाला. काही मुखवटाधारी गुंडांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोष हिच्यासह अठरा जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा देशभरातून विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि तज्ज्ञांनी कठोर शब्दांत निषेध केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विद्यापीठाच्या प्रशासनानेदेखील काही मुखवटाधारी हल्लेखोर कॅम्पसमध्ये आले आणि त्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ले करत मालमत्तेचीही तोडफोड केली असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे 
जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट्‌स युनियन (जेएनयूएसयू) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) या दोन्ही संघटनांनी परस्परांवर आरोप केले आहेत.

JNU Violence : योगेंद्र यादव यांना धक्काबुक्की (व्हिडिओ)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील या हल्ल्याची दखल घेत दिल्लीच्या पोलिस आयुक्तांकडून अहवाल मागविला आहे. विद्यापीठाच्या शिक्षक संघटनेच्या बैठकीमध्ये या हिंसाचाराची ठिणगी पडल्याचे सूत्रांनी सांगितले.

या वेळी अभाविपच्या गुंडांनी दगडफेक केल्याने विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोष हिच्या डोक्‍याला दुखापत झाल्याचे डाव्या विद्यार्थी संघटनांनी म्हटले आहे, तर अभाविपने मात्र डाव्या विद्यार्थी संघटनांनी हिंसाचार भडकाविला, त्यामध्ये आमचे 25 कार्यकर्ते जखमी झाल्याचा दावा केला आहे. एसएफआय, आयसा आणि डीएसएफ या डाव्या विद्यार्थी संघटना या हिंसाचाराला कारणीभूत असल्याचे अभाविपने म्हटले आहे. 

'जेएनयू'मध्ये पुन्हा राडा; विद्यार्थी संघटनेची प्रमुख जखमी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: JNU Violence Students and Teachers are beaten by Rods