JNU Violence : योगेंद्र यादव यांना धक्काबुक्की (व्हिडिओ)

पीटीआय
सोमवार, 6 जानेवारी 2020

- स्वराज अभियान पक्षाचे प्रमुख योगेंद्र यादव यांना "जेएनयू'बाहेर धक्काबुक्की करण्यात आली.

नवी दिल्ली : स्वराज अभियान पक्षाचे प्रमुख योगेंद्र यादव यांना "जेएनयू'बाहेर धक्काबुक्की करण्यात आली. अभाविपच्या गुंडांनी ही धक्काबुक्की केल्याचा आरोप योगेंद्र यादव यांनी केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये (जेएनयू) आज रात्री पुन्हा एकदा हिंसाचाराचा भडका उडाला. काही मुखवटाधारी गुंडांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोष हिच्यासह अठरा जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा देशभरातून विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि तज्ज्ञांनी कठोर शब्दांत निषेध केला आहे. 

त्यानंतर योगेंद्र यादव यांनादेखील धक्काबुक्की करण्यात झाली. त्यावर ते म्हणाले, पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. त्यांना जर एवढी भीती वाटत असेल, तर त्यांनी आपली वर्दी उतरवून ठेवावी.' तसेच गुंडांना थोपविण्यासाठी तिथे कोणीही उपस्थित नव्हते. या गुंडांनी मला बोलू दिले नाही, असा आरोपही यादव यांनी केला. 

#JNU : 'जेएनयू' मध्ये पुन्हा राडा; विद्यार्थी संघटनेची प्रमुख जखमी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yogendra Yadav manhandled outside JNU