जम्मूत घडविला जाणार होता घातपात?; 14 किलो आरडीएक्स जप्त

वृत्तसंस्था
Tuesday, 1 October 2019

भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी आज (मंगळवार) संयुक्त कारवाई केली. या कारवाईत एका बसची तपासणी करण्यात आली. या तपासणीत एका बसमधून 14 किलो आरडीएक्स जप्त करण्यात आले.

जम्मू : भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी आज (मंगळवार) संयुक्त कारवाई केली. या कारवाईत एका बसची तपासणी करण्यात आली. या तपासणीत एका बसमधून 14 किलो आरडीएक्स जप्त करण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणात आरडीएक्स हस्तगत करण्यात आल्याने जम्मूत मोठा घातपाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

येथील रस्त्यावरून पहाटे पाचच्यादरम्यान एक बस जात होती. त्यादरम्यान एक व्यक्ती बसचालकाजवळ आली. थोडावेळ बसचालकासोबत बोलणं झाल्यावर त्याने दोन बॅगा बसवाहकाकडे सोपवल्या. त्यानंतर वाहकाने या बॅगा बसच्या सीटखाली ठेवल्या. लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये काही संशयित गोष्टी असल्याचे लक्षात आल्याने तातडीने पाठलाग करण्यात आला. या बसच्या पाठलागादरम्यान लष्कराने जम्मूतील एका अकादमीजवळ बस पकडली. त्यावेळी बसमधून 14 किलोंचा आरडीएक्स जप्त करण्यात आला. तसेच पोलिसांनी बसचालक, वाहकासह बस जप्त केली. 

Vidhan Sabha 2019 : मोहोळमधून 'वंचित'तर्फे रमेश कदम!

दरम्यान, याप्रकरणी बसचालक, वाहक या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, सध्या त्यांची चौकशी केली जात आहे. 

ज्येष्ठ चित्रकार डी. व्ही. वडणगेकर यांचे निधन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Joint Operation Army And JK Police Has Been Successful 14 Kg RDX Recovered