Vidhan Sabha 2019 : मोहोळमधून 'वंचित'तर्फे रमेश कदम!

तात्या लांडगे
Tuesday, 1 October 2019

राष्ट्रवादीचे निलंबीत आमदार रमेश कदम यांना मुंबई उच्च
न्यायालयाने 6 ऑक्‍टोबरपर्यंत जामीन मिळाल्याचे समजातच मोहोळ विधानसभा मतदारसंघातून वंचित बहूजन आघाडीकडून त्यांना मैदानात उतरविण्याची तयारी सुरु आहे.

सोलापूर : राष्ट्रवादीचे निलंबीत आमदार रमेश कदम यांना मुंबई उच्च
न्यायालयाने 6 ऑक्‍टोबरपर्यंत जामीन मिळाल्याचे समजातच मोहोळ विधानसभा मतदारसंघातून वंचित बहूजन आघाडीकडून त्यांना मैदानात उतरविण्याची तयारी सुरु आहे. वंचित आघाडीने शहर मध्य अन्‌ मोहोळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा अद्याप केलेली नाही. दरम्यान, मागील विधानसभा निवडणुकीतील शिवसेनेनेच पराभूत उमेदवार तथा आता इच्छूक असतानाही उमेदवारी न मिळालेले मनोज शेजवाल कदम यांच्या भेटीला गेल्याने शिवसेनेचे उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाल्याची चर्चा आहे.

Vidhan Sabha 2019 : शिवसेनेकडून 70 उमेदवारांची यादी जाहीर

अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या घोटाळाप्रकरणात तुरुंगात असलेल्या रमेश कदमांना न्यायालयाने विधानसभा निवडणुकीचा अर्ज करण्याकरिता 6 ऑक्‍टोबरपर्यंत जामीन दिला आहे. तत्पूर्वी, त्यांच्या मुलीने मोहोळ तालुक्‍यात गावोगावी प्रचारही केला. राष्ट्रवादीतून आमदार झाल्यानंतर रमेश कदमांनी केलेली कामे अद्याप लोक विसरलेली नसून त्यांना उमेदवारी मिळाल्यास राष्ट्रवादी अथव शिवसेनेच्या उमेदवारासमोर कडवे आव्हान राहील असा अंदाज घेत वंचित बहूजन आघाडीने कदमांना उमेदवारी देण्याची तयारी ठेवली आहे मात्र, गौतम वडवे यांना वंचितने उमेदवारी देण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे मोहोळच्या उमेदवारीवरुन आता वंचितमध्ये वाद निर्माण झाल्याची चर्चा आहे. तर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून मागील विधानसभा निवडणुकीत विजयाच्या जवळ पोहचलेले एमआयएमचे शहराध्यक्ष तौफिक शेख यांना उमेदवारी देण्याची तयारी दर्शविली आहे.

Vidhan Sabha 2019 : भाजपची युवा ब्रिगेड बदलणार सत्तासमीकरण

'वंचित'ची उमेदवारी जाहीर
करमाळा : दशरथ कांबळे, बार्शी : महादेव काकडे, उत्तर सोलापूर : आनंद चंदनशिवे, अक्‍कलकोट : धर्मराज राठोड, दक्षिण सोलापूर : बाळासाहेब बंडगर, सांगोला : विष्णू यलमार, माळशिरस : राज यशवंत कुमार आणि संभाव्य उमेदवार मोहोळ : गौतम वडवे अथवा रमेश कदम, शहर मध्य : तौफिक शेख.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ramehs kadam candidate of vanchit bahujan aghadi for maharashtra vidhansabha 2019 from mohol