'आमचं म्हणणंच ऐकलं जात नाही'; जम्मू-काश्मीरमधील 20 प्रमुख काँग्रेस नेत्यांचा राजीनामा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जम्मू-काश्मीर : काँग्रेसमध्ये धुसफूस; २० प्रमुख नेत्यांचा राजीनामा

जम्मू-काश्मीर : काँग्रेसमध्ये धुसफूस; २० प्रमुख नेत्यांचा राजीनामा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जम्मू: जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसला मोठा झटका लागला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्या गटाशी निगडीत पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्ष गुलाम अहमद मीर यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप लावले आहेत. त्यांनी आपल्या राजीनाम्यात लिहलंय की, मीर यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस सातत्याने पिछाडीवर जात आहे. दुर्लक्ष करण्यामुळे याआधीच अनेक काँग्रेस नेत्यांनी राजीनामा दिला होता. राजीनामा देणाऱ्यांमध्ये चार माजी मंत्री आणि तीन आमदारांचा देखील समावेश आहे.

हेही वाचा: VIDEO: जोडप्याचं पॅरासिलिंग सुरु असताना दोरी तुटली अन्...

हेही वाचा: "पंतप्रधान मोदीही गांधींपासून प्रेरीत",भाजपनं कंगनाला फटकारलं

जम्मू काश्मीर काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी आणि माजी मंत्र्यांनी दुर्लक्षित करण्याचा आरोप लावत आपल्या पदाचा संयुक्त रित्या राजीनामा दिला आहे. आमच्या म्हणण्याकडे लक्षच दिलं जात नसल्याचा ठपका या नेत्यांनी ठेवला आहे. या राजीनाम्यात म्हटलंय की, गुलाम अहमद मीर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस अत्यंत दयनीय अवस्थेकडे निघाली आहे. आतापर्यंत 200 पेक्षा अधिक काँग्रेस नेत्यांनी पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश केला आहे.

या राजीनाम्याची प्रत राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि सोबतच प्रदेश प्रभारी असलेल्या रजनी पाटील यांना देखील पाठवली आहे. ज्या प्रमुख लोकांनी राजीनामा सोपवला आहे, त्यामध्ये जी एम सरुरी, जुगल किशोर शर्मा, विकार रसूल, डॉ. मनोहर लाल शर्मा, गुलाम नबी मोंगा, नरेश गुप्ता, सुभाष गुप्ता, अमीन भट, अनवर भट, इनायत अली आणि इतरही अनेक नेते सामील आहेत.

loading image
go to top