सर्वोच्च न्यायपीठावर मराठीचा झेंडा; शरद बोबडेंनी घेतली शपथ

वृत्तसंस्था
Monday, 18 November 2019

अयोध्या खटल्यातील ऐतिहासिक निवाडा असो की खासगीपणाचा अधिकार, न्या. बोबडे यांनी अनेक महत्त्वाचे आणि संवेदशील विषय यशस्वीपणे हाताळले. सरन्यायाधीश म्हणून बोबडे यांना सतरा महिन्यांचा कार्यकाळ मिळणार असून, ते 23 एप्रिल 2021 रोजी निवृत्त होतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना शपथ दिली.

नवी दिल्ली : देशाचे 47वे सरन्यायाधीश म्हणून मराठमोळे न्या. शरद अरविंद बोबडे (वय 63) यांनी आज (सोमवार) शपथ घेतली. अनेक महत्त्वाच्या खटल्यांच्या सुनावणीमध्ये त्यांचा सहभाग होता. शपथ घेतल्यानंतर बोबडे यांनी आईचे आशीर्वाद घेतले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

अयोध्या खटल्यातील ऐतिहासिक निवाडा असो की खासगीपणाचा अधिकार, न्या. बोबडे यांनी अनेक महत्त्वाचे आणि संवेदशील विषय यशस्वीपणे हाताळले. सरन्यायाधीश म्हणून बोबडे यांना सतरा महिन्यांचा कार्यकाळ मिळणार असून, ते 23 एप्रिल 2021 रोजी निवृत्त होतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना शपथ दिली.

पर्याय सर्वपक्षीय संयुक्त सरकारचा 

न्या. बोबडे यांना कायदा शाखेचा वारसा त्यांच्या घरातूनच मिळाला होता. त्यांचे वडील अरविंद श्रीनिवास बोबडे हे वकील म्हणून प्रसिद्ध होते. सेवाज्येष्ठता क्रमानुसार आता बोबडे सरन्यायाधीशपदी विराजमान होणार असून, खुद्द माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनीच त्यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारला केली होती. नागपूरमध्ये 24 एप्रिल 1956 साली शरद बाबडे यांचा जन्म झाला होता. त्यांनी कला आणि कायदा शाखेच्या पदवीचा अभ्यासक्रम नागपूर विद्यापीठातूनच पूर्ण केला. पुढे त्यांनी 1978 मध्ये वकिली क्षेत्रात पदार्पण केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात त्यांनी अनेक वर्षे वकिली केली. त्यानंतर पुढे त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये 21 वर्षे वकिली केली. बोबडे 1998 साली ज्येष्ठ विधिज्ञ बनले. 29 मार्च 2000 रोजी बोबडे मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश बनले. पुढे 16 ऑक्‍टोबर 2012 रोजी त्यांनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून सूत्रे हाती घेतली होती. 12 एप्रिल 2013 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली होती. 

शिवसेना संसदेत विरोधी बाकांवर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Justice Sharad Arvind Bobde takes oath as Chief Justice of India