

Bishnoi Gang Firing On Gurvinder Singh
ESakal
पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील समराला ब्लॉकमध्ये काल रात्री उशिरा एका कबड्डी खेळाडूची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मृत खेळाडूचे नाव गुरविंदर सिंग असे आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी लुधियानामध्ये कबड्डी खेळाडू तेजपालची हत्या करण्यात आली होती. कबड्डी खेळाडूंच्या सततच्या हत्यांमुळे परिसरात भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून गुन्हेगारांचा शोध सुरू केला आहे.