ठाकरे अन् राऊतांच्या अहंकारामुळे शिवसेनेत बंडखोरी, भाजप नेत्याचा दावा

ही तर शिवसेनेतील अंतर्गत लढाई आहे.
Kailash Vijayvargiya News
Kailash Vijayvargiya Newsesakal

इंदूर : महाराष्ट्रात शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राजकीय पेच निर्माण झाला आहे. शिंदे यांच्याबरोबर ५० आमदारांचे संख्याबळ असल्याचा दावा आमदार दीपक केसरकर यांनी केला आहे. लवकरच महाराष्ट्रात येऊन विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकू असे ते म्हणाले. रविवारी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत सामील झाले. या सर्व राजकीय नाट्यात सुरुवातीपासूनच भारतीय जनता पक्षाकडून सहभागी नसल्याचा दावा केला जात आहे. (Kailash Vijayvargiya Says Because Of Uddhav Thackeray And Sanjay Raut Political Crisis In Maharashtra)

Kailash Vijayvargiya News
राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ, ६ हजार ४९३ जण बाधित

मात्र काही घडामोडींवरुन शिवसेनेत (Shiv Sena) बंडखोरी घडवून आणण्यात भाजप असल्याचे स्पष्ट होत आहे. रविवारी शिंदे गटाच्या काही आमदारांच्या घरांना केंद्रातील भाजप सरकारने केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात केले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांची बडोद्यात भेट घेतल्याचे वृत्त आहे. भेटीसाठी शिंदे हे विमानाने गुवाहाटीहून बडोद्याला गेले होते. (Maharashtra Politics)

Kailash Vijayvargiya News
प्रवीण दरेकर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, राजकीय चर्चेला उधाण

शिवसेनेतील बंडखोरीवर भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी टीका केली आहे. ही शिवसेनेतील अंतर्गत लढाई आहे. त्यास उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांचे अहंकार कारणीभूत आहे. लोकशाहीत अहंकार, हुकूमशाही चालत नाही, असे विजयवर्गीय म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com