लाज वाटत नाही का? खासदार निधी खर्च होत नसल्यानं कंगना रनौत संतापल्या; म्हणाल्या, निगेटिव्ह प्रचार होतोय, रील्स बनतायत

Kangana Ranaut हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार कंगना रनौत यांनी अधिकाऱ्यांना खासदार निधीतून कामे होत नसल्यानं खडसावलं. तुमचं काम मी हातात घेतलं तर एका दिवसात करून दाखवेन असंही त्या म्हणाल्या.
Mandi MP Kangana Ranaut Warns Officials Over Development Delays

Mandi MP Kangana Ranaut Warns Officials Over Development Delays

Esakal

Updated on

हिमाचल प्रदेशात २०२७ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या तयारीला भाजप आतापासूनच लागले आहे. भाजपचे खासदार राज्यात सक्रीय झालेत. मंडीमधून खासदार अभिनेत्री कंगना रनौत या दिशा बैठकीत पोहोचल्या होत्या. या बैठकीत कंगना रनौत यांनी अधिकाऱ्यांना कठोर शब्दात खडसावलं. अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे खासदार निधी अर्धाही खर्च झाला नाही असंही त्या म्हणाल्या. याआधी कंगना रनौत यांना खासदार निधीबाबत विचारण्यात आलं होतं तेव्हा खासदार निधीबाबत माहिती नसल्याचं त्या म्हणाल्या होत्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com