Delhi Girl Accident : पीडितेचा मृत्यू नेमका कसा झाला? समोर आला पोस्टमॉर्टम रिपोर्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kanjhawala Death Case

Delhi Girl Accident : पीडितेचा मृत्यू नेमका कसा झाला? समोर आला पोस्टमॉर्टम रिपोर्ट

Kanjhawala Accident Case : दिल्लीतील कांजवाला प्रकरणातील पीडितेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे.

हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये पीडितेचे लैंगिक शोषण झाले नसल्याचे स्पष्ट झाले असून, मुलीच्या अंगावर अनेक जखमा आढळून आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, प्रायव्हेट पार्टवर कोणत्याही प्रकारची जखम आढळून आलेली नाही. त्यामुळे तिच्यावर बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार झाल्याचे म्हणता येणार नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा: Delhi Girl Accident : अपघातानंतर अंजली घरी गेली होती; मैत्रिणीच्या जबाबाने खळबळ

कांजवाला येथे घडलेल्या या घटनेत एका 20 वर्षीय तरुणीच्या स्कूटीला कारने धडक दिली. त्यानंतर संबंधित कार न थांबता मुलीला सुलतानपुरी ते कांझावाला सुमारे 12 किलोमीटरपर्यंत कारसोबत फरफटत नेले. यादरम्यान, मुलीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी कारमधून प्रवास करणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे. 

दरम्यान, पीडित मुलीचा मृत्यू कार अपघाताता झाल्याचे मानण्यास कुटुंबियांनी नकार दिल्यानंतर तसेच मुलीचा लैंगिक छळ झाल्याची शक्यता घरच्यांची व्यक्त केली होती. त्यानंतर पीडितेचे पोस्ट मॉर्टम करण्यात आले. त्याचा अहवाल आज समोर आला आहे. मात्र, त्यात मुलीवर कोणतेही लैंगिक अत्याचार झाले नसल्याचे नमुद करण्यात आले आहे.