Eknath Shinde : माज सुरुच, बसनंतर कन्नड रक्षण वेदिकेनं CM शिंदेंच्या पुतळ्याचं केलं दहन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुतळ्याचं दहन केल्यामुळं कर्नाटकात मराठी भाषिकांतून तीव्र संपात व्यक्त होत आहे.
Kannada Rakshana Vedike
Kannada Rakshana Vedikeesakal
Summary

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुतळ्याचं दहन केल्यामुळं कर्नाटकात मराठी भाषिकांतून तीव्र संपात व्यक्त होत आहे.

बेळगाव : गेल्या सुमारे पाच दशकांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकदरम्यान सीमावाद सुरू आहे. या प्रश्नावर महाराष्ट्रासह सीमावर्ती भागांत अनेकदा तीव्र आंदोलनं झाली आहेत. या वादावरून दोन्ही राज्यांमध्ये न्यायालयीन लढाईदेखील सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरून (Maharashtra-Karnataka Border Dispute) राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्रात भाजप सत्तेत आहे. मात्र, या दोन्ही राज्यांतील भाजप नेते सीमाप्रश्नी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यातच आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सांगलीमधील जत तालुका आणि सोलापूर, अक्कलकोटवर दावा सांगितल्यानंतर सीमावाद दिवसागणिक पेटत चालला आहे.

Kannada Rakshana Vedike
Jodhpur : लग्न सोहळ्यात सिलिंडरचा मोठा स्फोट; 63 हून अधिक जण होरपळले, 4 वऱ्हाडी ठार

महाराष्ट्रातील अनेक पक्षातील खासदारांनी सीमावादाचा प्रश्न केंद्रानं सोडवावा अशी मागणी केली आहे. त्यामुळं हा वाद केंद्रानं सोडवण्याच्या मागणीनं जोर धरला असतानाच कर्नाटकात मात्र महाराष्ट्रविरोधी वातावरणानं आणखी जोर पकडलाय. कर्नाटकात महाराष्ट्राविरोधात वातावरण आणखी चिघळलं असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पुतळ्याचं कन्नड रक्षण वेदिकेच्या (Kannada Rakshana Vedike) कार्यकर्त्यांनी गदगमध्ये दहन केलं आहे. त्यामुळं आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

Kannada Rakshana Vedike
Bus Service : सीमावाद सुरु असतानाच प्रवाशांना मोठा दिलासा! कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा पुन्हा सुरू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचं दहन केल्यामुळं आता कर्नाटकातील मराठी भाषिकांविरोधात तीव्र संपात व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात लोकांच्या भावना भडकवल्या जात असल्याचं मत सीमाभागातील मराठी भाषिकांमधू व्यक्त केली जात आहेत. कर्नाटकातील गदगमध्ये महारष्ट्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शन केली आहेत. यावेळी महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या वाहनांवर चढून कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुतळ्याचं दहन करत संताप व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com