दिवाळीच्या रात्री भाजप आमदाराच्या भावाची गोळ्या झाडून हत्या; काँग्रेस नेत्यावर गंभीर आरोप

BJP MLA Archana Pandey's Brother Shot Dead : हत्येमागे राजकीय वैमनस्य आणि जमिनीचा वाद असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात काँग्रेस नेते अमूल दीक्षित यांच्यावर हत्येचा आरोप असून, ते सध्या फरार असल्याची माहिती आहे.
BJP MLA Archana Pandey's Brother Shot Dead

BJP MLA Archana Pandey's Brother Shot Dead

Updated on: 

उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यात दिवाळीच्या रात्री धक्कादायक घटना घडली आहे. भाजप आमदार अर्चना पांडे यांच्या भावाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, दिवाळीच्या आनंदावर शोककळा पसरली आहे. या हत्येमागे राजकीय वैमनस्य आणि जमिनीचा वाद असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात काँग्रेस नेते अमूल दीक्षित यांच्यावर हत्येचा आरोप असून, ते सध्या फरार असल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...