Kanpur Train Accident
esakal
देशात अवघ्या १२ तासांच्या अंतराने दोन रेल्वे अपघात घडल्याने रेल्वे प्रशासनाची चिंता वाढली आहे. बुधवारी सकाळी आसाममधील गुवाहाटीजवळ सायरांग-कोलकाता एक्स्प्रेसचे इंजिन आणि पाच डबे रुळावरून घसरले. या घटनेनंतर आता संध्याकाळी उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये चौरीचौरा एक्स्प्रेसचा अपघात झाला आहे. या गाडीचे एसी थर्डचे तीन डबे रुळावरून घसरले. सुदैवाने गाडीचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. या दोन्ही घटनांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.