
मुलाच्या मृतदेहाजवळ दोन ग्लास आणि दारूची बाटलीही सापडलीय.
नग्न अवस्थेत शरीर, सिगारेटचे चटके, डोळ्यांवर जखमा आणि मानेजवळ बुटाचे व्रण.. कानपूरमध्ये एका 10 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडालीय. मुलावर क्रूर कृत्ये करण्यात आलीयत. हे दृष्य पाहून परिसरातील नागरिकांसह मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी आलेले पोलिसही हादरले आहेत.
हे मूल दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाले होते. त्याचा मृतदेह मंगळवारी सापडला. ज्यांनी या मुलाची हत्या केलीय, त्यांनी त्याचे डोळेही काढले आहेत. डोळ्याजवळ एक खिळा सापडला असून खिळ्याने डोळे काढल्याचा अंदाज आहे. मुलाच्या मानेजवळ बुटाचे काही निशाण आढळून आलेत. मृत्यू झाल्यानंतर, मुलाची मान बुटानं चिरडल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
मुलाच्या मृतदेहाजवळ दोन ग्लास आणि दारूची बाटलीही सापडलीय. मारेकरी दोघे असावेत, असा संशय व्यक्त केला जातोय. दारू पिऊन त्यांनी मुलावर अत्याचार करुन हत्या केल्याचाही अंदाज आहे. मुलाच्या चेहऱ्यावर सिगारेटचे चटके दिल्याच्याही खुणा आढळल्या आहेत. हत्येनंतर मुलाला जमिनीवरुन ओढत नेल्याने त्याच्या पाठीवर जखम झालीय.
कानपूर एसपी अजित कुमार सिन्हा (Kanpur SP Ajit Kumar Sinha) यांनी सांगितलं की, 'मुलावर केलेल्या क्रुरतेतून मारेकऱ्यांचा मुलांबद्दल द्वेष दिसून येतो, हा द्वेष का होता? हे मारेकरी पकडल्यानंतरच कळेल. मुलावर झालेल्या क्रूरतेमुळं माझंही हृदय हादरलंय.' या प्रकरणात पोलिसांचा निष्काळजीपणाही चव्हाट्यावर आलाय. कारण, सोमवारपासून मुलगा बेपत्ता असल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे, त्यामुळं ते चौकी आणि पोलिस ठाण्यातही गेले होते. मात्र, पोलिसांनी कोणताही शोध घेतला नाही. दुसऱ्या दिवशी मुलाचा मृतदेह सापडला असून सध्या मुलाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.