esakal | उत्तर प्रदेशात कोरोनामुळं 'कावड यात्रा' अखेर रद्द!
sakal

बोलून बातमी शोधा

Kanwar Yatra

उत्तर प्रदेशात कोरोनामुळं 'कावड यात्रा' अखेर रद्द!

sakal_logo
By
अमित उजागरे

लखनऊ : उत्तराखंडनंतर आता उत्तर प्रदेशातही 'कावड यात्रा' कारोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारनं शनिवारी ही माहिती दिली. सुप्रीम कोर्टानं सरकारला फटकारल्यानंतर योगी सरकारनं हा निर्णय घेतला. (Kanwar Yatra has been cancelled in Uttar Pradesh in view of COVID19 aau85)

सुप्रीम कोर्टानं शुक्रवारी म्हटलं होतं की, "धार्मिक भावनांसह सर्व प्रकारच्या भावना जगण्याच्या अधिकारापुढे गौण आहेत. त्यामुळे १९ जुलैपर्यंत प्रातिनिधीक कावड यात्रा थांबवण्याबाबत पुनर्विचार केला काही नाही याबाबत सांगावं, असे आदेश उत्तर प्रदेश सरकारला दिले होते. कोविडच्या पार्श्वभूमीवर सरकारला पायी कावड यात्रेला कुठल्याही परिस्थितीत परवानगी देण्यात येणार नाही. आपण सर्व भारताचे नागरिक आहोत. सुओमोटे याचिका कलम २१ अंतर्गत सर्वांसाठी लागू आहे. हे आपल्या सर्वांचं संरक्षण करणार आहे, असंही कोर्टानं म्हटलं होतं.

हेही वाचा: दुबई-मुंबईच्या विमानात बॉम्बच्या धमकीनं खळबळ!

यासंदर्भात कोर्टानं नुकतंय केंद्र सरकारकडे विचारणा केली होती त्यावर उत्तर देताना केंद्रानं कोर्टाला सांगितलं, "कोरोना महामारीमुळं राज्य सरकारांना कुठल्याही प्रकारे कावड यात्रा काढण्याची परवानगी देण्यात आलेली नाही."

हेही वाचा: कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची होणार आता क्षयरोग चाचणी!

न्या. आर. एफ. नरिमन आणि न्या. बी. आर. गवई यांच्या खडंपीठानं याबाबत विचारना करता म्हटलं की, "प्रत्येकाला घटनेतील कलम २१ नुसार, जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार कावड यात्रा पूर्णपणे थांबवण्याबाबत आधीच्या निर्णयाचा पुनर्विचार करेल का?

loading image