'काँग्रेसशी आघाडी करुन सर्वकाही गमावलं', कुमारस्वामींना सलतंय दुःख

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 6 December 2020

जर भाजपशी आमचे चांगले संबंध असले असते तर आजही मी मुख्यमंत्रिपदी राहिलो असतो. परंतु, काँग्रेसशी आघाडी करुन मी सर्व काही गमावलो

बंगळुरु- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री तथा जनता दलाचे (सेक्युलर) नेते एचडी कुमारस्वामी यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसवर टीका करताना त्यांनी भाजपचे कौतुकही केले. जर भाजपशी आमचे चांगले संबंध असले असते तर आजही मी मुख्यमंत्रिपदी राहिलो असतो. परंतु, काँग्रेसशी आघाडी करुन मी सर्व काही गमावलो, अशी खंतही कुमारस्वामी यांनी यावेळी व्यक्त केली. 

कुमारस्वामी म्हणाले की, मी भाजपशी चांगले संबंध टिकवू शकलो असतो तर आजही मुख्यमंत्रिपदी कायम राहिलो असतो. 2006-2007 मध्ये आणि 12 वर्षांच्या काळात मी जे नाव कमावलो होतो. ते सर्व काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी करुन गमावून बसलो. 

हेही वाचा- महाराष्ट्र सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा दावा

2018 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर केवळ एका महिन्यातच मला अश्रू अनावर झाले. मला माहीत होतं की, काय सुरु आहे. काँग्रेसने 2018 मध्ये माझ्यासोबत जे केले, तशी भाजप माझ्याशी 2008 मध्ये वागली नव्हती. 

हेही वाचा- B.R Ambedkar Death Anniversary: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसंबंधीत 10 रंजक गोष्टी

कुमारस्वामी यांनी यापूर्वी काँग्रेस पक्षाला 'घोडेबाजार'ची उपमा दिली होती. काँग्रेस राजकीय पक्षात फूट पाडणे आणि आमदार खरेदी करण्यात अव्वल आहे. त्यांच्यामुळेच राजकारणात 'हॉर्स ट्रेडिंग' (घोडेबाजार) हा शब्द रुजू झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. काँग्रेसने ज्या पद्धतीने राजस्थामधील बसपा आमदारांना फूस दिली. ती आमदारांची खरेदी नव्हती का असा सवाल कुमारस्वामी यांनी केला. 

हेही वाचा- लशींसाठी मागणी नोंदविण्यात भारत अग्रस्थानी; किती कोटी डोस मागविले पहा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: karanataka jds leader ex cm hd kumaraswamy says Lost everything after alliance with the Congress