Karmabhoomi Express Fire Accident : दिवाळीच्या तोंडावर पंजाबमध्ये मोठा रेल्वे अपघात ! अमृतसरहून न्यू जलपाईगुडीकडे जाणाऱ्या 'कर्मभूमी एक्सप्रेस'च्या ४ डब्यांना भीषण आग

Karmabhoomi Express catches fire in Punjab : सणासुदीला घरी जाणाऱ्या प्रवाशांमध्ये प्रचंड पळापळ; लोको पायलटच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला, पाहा नेमकं काय घडलं?
Massive fire to 4 coaches of running Karmabhoomi Express in Punjab

Massive fire to 4 coaches of running Karmabhoomi Express in Punjab

Sakal

Updated on: 

दिवाळी आणि आगामी सणासुदीच्या निमित्ताने घरी जाणाऱ्या प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एका धावत्या सुपरफास्ट एक्सप्रेसला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागल्याची अत्यंत थरारक घटना समोर आली आहे. पंजाबमधील पतियाळा जिल्ह्यात राजपुराजवळ सराय बंजारा रेल्वे स्थानकाजवळ अमृतसरहून न्यू जलपाईगुडीकडे जाणाऱ्या 'कर्मभूमी एक्सप्रेस'च्या (Karmabhoomi Express - 12508) तब्बल चार डब्यांना या आगीने वेढले. बघता बघता आगीचे उंच लोळ आणि काळ्या धुराचे साम्राज्य पसरल्याने गाडीत प्रचंड गोंधळ आणि आरडाओरड सुरू झाली.

Loading content, please wait...