मोठी बातमी! कर्मभूमी एक्स्प्रेसच्या ४ डब्यांना भीषण आग; प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं

Karmabhoomi Express Fire : या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. दरम्यान, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असून, परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.
Karmabhoomi Express Fire

Karmabhoomi Express Fire

esakal

Updated on: 

पंजाबमधील पटियाला येथील राजपुरा परिसरात कर्मभूमी एक्स्प्रेसच्या चार डब्यांना भीषण आग लागल्याची घटना घडली. ट्रेन सुरू असतानाच अचानक आग लागल्याने डब्यांमधून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडू लागला. मिळालेल्या माहितीनुसार, ही ट्रेन अमृतसरहून बिहारच्या दिशेने जात होती.

प्राथमिक माहितीनुसार, ट्रेनच्या पँट्री कारमधून आगीला सुरुवात झाली. दिवाळीचा सण असल्याने ट्रेनमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. त्यामुळे आग लागल्याचं समजताच प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

Loading content, please wait...