VIDEO : अचानक पाईपमधून निघू लागल्या नोटा; पाण्यासारखा पैसा पाहून अधिकारी चक्रावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kalaburagi

लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कर्नाटकातील कलबुर्गी येथे पीडब्ल्यूडी कनिष्ठ अभियंता यांच्या घरावर छापा टाकला.

VIDEO : पाईपमधून निघू लागल्या नोटा अन् पाण्यासारखा पैसा पाहून..

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

बंगळुरू : लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं (Anti Corruption Bureau) कर्नाटकातील (Karnataka) कलबुर्गी (Kalaburagi) येथे पीडब्ल्यूडी कनिष्ठ अभियंता यांच्या घरावर छापा टाकला. या अभियंत्याच्या घरातून कोट्यवधी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त करण्यात आलीय. यादरम्यान छापेमारीचा व्हिडिओ आता समोर आलाय. या व्हिडिओमध्ये छापा टाकणारे अधिकारी अभियंत्याच्या घरातील ड्रेनेज पाईपमधून पैसे काढताना दिसत आहेत. पाइपलाइनमधून एवढा पैसा बाहेर आल्याचे पाहून अधिकाऱ्यांचे डोळे चक्रावले.

घराच्या पाईपमधून लाखोंची रोकड जप्त

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) एक पथकानं ACB चे उत्तर-पूर्व परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक महेश मेघननवर (Superintendent of Police Mahesh Meghannavar) यांच्या नेतृत्वाखालील कनिष्ठ अभियंता शांतनगौडा बिरदार (Shantangauda Birdar) यांच्या गुब्बी कॉलनीतील निवासस्थानाची 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता झडती घेतली. बिरदार हे पीडब्ल्यूडी जेवरगी उपविभागात कनिष्ठ अभियंता आहेत. पथकानं त्यांच्या घरावर छापा टाकून घरातील पाईपमधून लाखोंची रोकड जप्त केलीय.

हेही वाचा: काँग्रेस घाबरली? कार्यालयात लावला इंदिरा गांधींसोबत सरदार पटेलांचा PHOTO

एका पाईपमधून निघाले 13 लाख

एसीबीच्या अधिकार्‍यांकडे अभियंत्याच्या घरातील बेहिशेबी पैसे साठवलेल्या ठिकाणाची अचूक माहिती होती. एसीबीनं पीव्हीसी पाईप कापण्यासाठी प्लंबरला बोलावलं. त्यांना पाईपमध्ये लपवून ठेवलेली मोठी रोकड सापडली. विभागाच्या पथकानं जेवरगी शहरात असलेल्या अभियंत्याच्या घरी जाऊन सुमारे लाखो रुपयांची रोकड जप्त केलीय. पथकानं अभियंत्याच्या घरातून सोनंही जप्त केलं असून, एकूण 54 लाखांची रोकड व सोनं जप्त करण्यात आलंय. 13 लाख रुपये नुकतेच पाईपमधून बाहेर काढण्यात आले आहेत.

पाईपमधून नोटा गोळा करण्यासाठी बादलीचा वापर

500-500 रुपयांच्या नोटांचे बंडल या अभियंत्याने अशा ठिकाणी लपवून ठेवले होते, की कोणी कल्पनाही करू शकत नाही. पाईपमधून नोटा जमा करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला बादलीचा वापर करावा लागला. नोटा इतक्या होत्या, की बादली भरली होती. 15 अधिकाऱ्यांच्या बेहिशोबी मालमत्तेच्या तक्रारी आल्यानंतर बुधवारी 8 एसपी, 100 अधिकारी आणि 300 कर्मचाऱ्यांच्या पथकानं 60 ठिकाणी झडती घेतली.

Karnataka

Karnataka

हेही वाचा: 'चंद्रकांत पाटलांनी भाकीत व्यक्त करण्याचा व्यवसाय सुरू केलाय'

करोडोंची बेनामी मालमत्ता सापडली

निवासस्थानात सापडलेल्या मालमत्तेच्या कागदपत्रांवरून असं दिसून येतं, की पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याकडं कलबुर्गीमधील गुब्बी कॉलनी आणि बडेपूर येथे घरे, ब्रह्मपुरमध्ये दोन निवासी भूखंड आणि कोटनूर डी एक्स्टेंशनमध्ये दोन अन्य भूखंड, 35 एकर शेतजमीन आणि हंगरगा गावात दोन फार्महाऊस आहेत. एसीबीच्या सूत्रांनी सांगितलं की, मालमत्तेची किंमत अद्याप निश्चित झालेली नाही.

हेही वाचा: NCP कार्यालयावर दगडफेक दुर्दैवी : शरद पवार

कर्नाटक राज्यात 60 ठिकाणी एसीबीची छापेमारी

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी १५ अधिकाऱ्यांच्या घरे व कार्यालये अशा ६० ठिकाणांवर छापे टाकले. त्यांच्या मिळकतीची चौकशी सुरू होती. या छाप्यात ८ एसपी, १०० अधिकाऱ्यांसह ४०८ पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या पथकाचा समावेश होता. एकाच वेळी छापे घालून अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी सुरू केली. अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे मालमत्ता मिळविली असल्याच्या शेकडो तक्रारी आल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. छाप्यात सापडलेल्या मालमत्तेची एकत्रित मोजणी करताना अधिकाऱ्यांची दमछाक झाली. गदग येथील कृषी विभागाचे सहसंचालक टी. एस. रुद्रेशप्पा, दोड्डबळ्ळापूर येथील महसूल अधिकारी लक्ष्मीकांतय्या, जेवरगी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एस. एम. बिरादार, गोकाकचे वरिष्ठ मोटार वाहन निरीक्षक सदाशिव मरलिंगन्नावर, बंगळूर शहरातील सकाल केएएस अधिकारी नागराजू, यलहंका सरकारी रुग्णालयाचे फिजिओथेरपिस्ट राजशेखर, बीबीएमपी कर्मचारी बागलुगुंडे गिरी, गुलबर्गा येथील शांतनगौडर, मंगळूर महानगर कार्यकारी अभियंता के. एस. लिंगेगौडा, हेमावती डावा कालवा कार्यकारी अभियंता श्रीनिवास के., बंगळूर निर्मिती केंद्राचे प्रकल्प व्यवस्थापक म्हणून निवृत्त झालेले वासुदेव, रायबाग येथील सहकार खात्याचे विकास अधिकारी ए. के. मास्ती, बेळगाव हेस्कॉमचे लाईन मेकॅनिक द्वितीय दर्जा अधिकारी नाथाजी पाटील, बळ्ळारीचे निवृत्त उपनिबंधक शिवानंद, नंदिनी डेअरी बंगळूरचे सरव्यवस्थापक बी. कृष्णारेड्डी यांच्या घरे व कार्यालयांवर छापे टाकून तपासणी करण्यात येत असल्याची माहिती एसीबीचे पोलिस महासंचालक (एडीजीपी) सिमांतकुमार सिंग यांनी दिली.

हेही वाचा: मरेपर्यंत पवारसाहेबांची साथ सोडणार नाही; पण..

loading image
go to top