esakal | कर्नाटक, आंध्रपुढे केंद्राने टेकले गुडघे
sakal

बोलून बातमी शोधा

Onion

दक्षिणेतील खरीप कांद्याचे पावसाने नुकसान झाल्याने नाशिकच्या उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळत असताना केंद्र सरकारने १४ सप्टेंबरला निर्यातबंदी केली. त्यास २५ दिवस होत नाहीत तोच केंद्राने कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातील शेतकऱ्यांपुढे गुडघे टेकत, बंगळूरचा गुलाबी व कृष्णापुरम कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली.

कर्नाटक, आंध्रपुढे केंद्राने टेकले गुडघे

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली/ नाशिक - दक्षिणेतील खरीप कांद्याचे पावसाने नुकसान झाल्याने नाशिकच्या उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळत असताना केंद्र सरकारने १४ सप्टेंबरला निर्यातबंदी केली. त्यास २५ दिवस होत नाहीत तोच केंद्राने कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातील शेतकऱ्यांपुढे गुडघे टेकत, बंगळूरचा गुलाबी व कृष्णापुरम कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्यावर्षी २९ सप्टेंबरला कांदा निर्यातबंदी केंद्राने केली. २८ ऑक्टोंबर २०१९ ला ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत ९ हजार मेट्रिक टन बंगळूर गुलाबी कांद्याच्या निर्यातीचा निर्णय घेतला. पुढे ६ फेब्रुवारी २०२०ला ३१ मार्च २०२० पर्यंत कृष्णापुरम कांद्याच्या निर्यातीला केंद्राने परवानगी दिली. त्यावेळीही आताप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी नाराजीचा सूर आळवला होता. वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी ट्विट करुन बंगळूर गुलाबी आणि कृष्णापुरम कांद्याच्या निर्यातीची माहिती स्पष्ट केली. त्याचप्रमाणे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने यासंबंधीची अधिसूचना आज जारी केली. 

स्विस बँकेत कुणा-कुणाची खाती ? भारत सरकारला मिळाली दुसरी यादी

बंगळूर आणि कृष्णापुरम या दोन्ही कांद्याची प्रत्येकी १० हजार टन कांद्याच्या निर्यातीला ३१ मार्च २०२१ पर्यंतची मर्यादा निश्‍चित करुन देण्यात आली आहे. या दोन्ही कांद्याची निर्यात चेन्नईच्या बंदरातून करावयाची आहे. त्यासाठी निर्यातदारांना कर्नाटक आणि आंध्रप्रदेशच्या फलोत्पादन आयुक्तांकडून प्रमाणपत्र घ्यावे लागेल. त्याचबरोबर प्रमाणपत्राच्या आधारे निर्यातदारांची नोंदी केल्यावर या दोन्ही कांद्याच्या वाणाच्या निर्यातीला सुरवात होईल. 

राहुल गांधींनी शेअर केला मोदींची खिल्ली उडवणारा व्हिडिओ

दरम्यान, दक्षिणेतील कांद्याचे हे दोन्ही वाण आकाराने लहान आहेत. हा कांदा तिखट असल्याने त्याचा विशेषतः सांबरसाठी वापर केला जातो. श्रीलंका, मलेशिया, तैवान, थायलंड, सिंगापूर, बांगलादेश, अरब राष्ट्र, हाँगकाँगमध्ये हा कांदा पाठवला जातो. कांद्याच्या या दोन्ही वाणाला जीआय टॅग मिळालेला आहे. बंगळूर कांद्याचे चिकबल्लापूर, बंगळूर ग्रामीण आणि कोल्हार जिल्ह्यात जवळपास ५ हजार एकरावर उत्पादन घेतले जाते. त्यातून ६० हजार टनापर्यंत उत्पादन शेतकरी घेतात. कृष्णापुरम कांद्याचे उत्पादन आंध्रप्रदेशमध्ये घेतले जाते. लॉकडाउनमध्ये निर्यातीवर कुऱ्हाड कोसळल्याने बंगळूर कांद्याची विक्री ६ रुपये किलोने झाली.   १६ ते १८ रुपये किलो भाव अपेक्षित होता. 

चारा घोटाळा - लालूंना जामीन मंजूर; मुक्काम मात्र तुरुंगातच

केंद्राकडे कांद्याविषयीची फारशी माहिती नसल्याने आताच्या निर्यातबंदीचा फारसा परिणाम चाळींमध्ये साठवलेल्या कांद्याच्या भावावर होऊ शकलेला नाही.
- चांगदेवराव होळकर, नाफेडचे माजी अध्यक्ष

Edited By - Prashant Patil

loading image