Karnataka Result : चौथं राज्य काबिज? ...म्हणून कर्नाटकमध्ये काँग्रेसने बाजी मारली; नाना पटोलेंचा खुलासा

Rahul gandhi, nana Patole
Rahul gandhi, nana Patole

Karnataka Assembly Election Results 2023 : कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्ष मॅजिक फिगरच्या जवळ पोहोचलं आहे. देशभरातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केलाय. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संभाव्य विजयाचं गुपित सांगितलं आहे.

नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधींचं नेतृत्व आज पुन्हा सिद्ध झालं आहे. त्यांनी साडेतीन-चार हजार किलोमीटरची यात्रा केली. त्यामुळे थेट लोकांशी त्यांना कनेक्ट निर्माण झाला. लोकांचे प्रश्न त्यांनी समजून घेतलं. जनतेचे दुःख त्यांनी लोकसभेत मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच सदस्यत्व रद्द करण्याचं पाप भाजपने केलं. त्यांना बेघर केलं गेलं. राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये कर्नाटक निवडणूक लढवली गेली. जवळपास २६ प्रचारसभा राहुल गांधीं कर्नाटकमध्ये केल्या.

Rahul gandhi, nana Patole
Karnataka Election Result : कर्नाटकात शरद पवारांची NCP खातं उघडणार? निपाणीतून उत्तम पाटलांनी घेतली आघाडी

पटोले पुढे म्हणाले की, २०२४ मध्ये राहुल गांधी हेच नेतृत्व करतील. त्यांना देशासाठी लढण्याचा आणि त्यागाचा वारसा आहे. ते एक सुशिक्षित नेतृत्व आहेत. आता देशात परिवर्तन होणार, हे निश्चित. असा विश्वास पटोलेंनी व्यक्त केला.

सध्या काँग्रेस पक्ष स्पष्ट बहुमताच्या दिशेने झेपावलं आहे. सकाळी साडेनऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस ११२ जागांवर आघाडीवर असून भाजप ८६ जागांच्या पुढे आहे. तर जेडीएस २३ जागांवर आघाडीव र आहे. इतर तीन जागांवर पुढे आहेत.

Rahul gandhi, nana Patole
Cabinet Expansions: कोणाच्या दारापुढे ‘लाल’ दिव्याची गाडी? मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला मिळणार संधी

राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे. आता कर्नाटकमध्ये काँग्रेसचा संभाव्य विजय होत आहे. त्यामुळे काँग्रेसकडे चौथं राज्य येण्याची शक्यात निर्माण झालेली असून देशभरातील काँग्रेसमध्ये एक नवा उत्साह बघायला मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com