उद्या बंद; 'या' सेवांवर होणार परिणाम

वृत्तसंस्था
Wednesday, 12 February 2020

- वाहतूक सेवेवर होणार सर्वाधिक परिणाम.

बंगळुरू : नोकऱ्यांमधील आरक्षणासाठी असलेले सरोजिनी महिशी याची अंमलबजावणी केली जावी, यासाठी कर्नाटकमधील विविध संघटनांनी उद्या (ता.13) 'कर्नाटक बंद'ची हाक दिली आहे. त्यानुसार उद्या कर्नाटकात बंद पाळला जाणार आहे. या बंदमुळे विविध सेवांवर याचा थेट परिणाम होणार आहे. वाहतूक सेवांवर या बंदचा विशेष फटका बसण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सरोजिनी महिशी रिपोर्टनुसार, कन्नड भाषिकांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळू शकेल. त्यामुळे उमेदवारांना खासगी तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळण्यास मदत होणार आहे.  'कर्नाटक बंद'चा फटका थेट प्रवाशांना बसणार आहे. मात्र, नम्मा मेट्रो आणि बंगळुरु मेट्रोपोलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (बीएमटीसी) या सार्वजनिक वाहतूक सेवेवर याचा अद्याप कोणताही परिणाम होणार नसल्याचे सांगितले जात आहे. 

Delhi Elections : केजरी'वॉल' अभेद्य

तसेच कर्नाटक राज्य रस्ते परिवहन महामंडळ (केएसआरटीसी) कर्मचारी आणि कर्मचारी संघटनांनी बंदमध्ये सहभागी व्हायचे की नाही, याबाबतचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. 

दरम्यान, या बंदमुळे सकाळी 6 ते सायंकाळी 6 च्या दरम्यान कॅब सेवाही बंद असल्यामुळे जे कॅब मालक आणि रिक्षाचालक आदर्श ऑटो आणि टॅक्सी संघटना आणि भारत वाहन मालक आणि चालक संघटनेचे भाग आहेत, त्यांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. 

केजरीवालांच्या घरी आज 'डबल सेलिब्रेशन'; हे आहे दुसरं खास कारण!

जवळपास 90 हजारांहून अधिक रिक्षाचालक आमच्या भागात आहेत. हे सर्वजण कर्नाटक बंदमध्ये सहभागी असणार आहेत. आम्हाला याची कल्पनाही नाही, आणखी किती लोक यामध्ये सहभागी होतील. पण आमच्या संघटनेतील सदस्य सहभागी होणार आहेत, असे 'आदर्श ऑटो रिक्षा चालक संघटने'चे अध्यक्ष मंजूनाथ यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karnataka Bandh on 13 February Cab and auto services likely to be hit in Bengaluru