येडियुराप्पांनाही कोरोनाची लागण; प्रकृती स्थीर

टीम ई-सकाळ
Monday, 3 August 2020

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

नवी दिल्ली :  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं काल सायंकाळी स्पष्ट झालं. माझी प्रकृती नीट असून, डॉक्टरांच्या सल्ल्याने मी हॉस्पिटलमध्ये दाखल होत असल्याचं ट्विट काल सायंकाळी अमित शहा यांनी केलं होतं. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

देशभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

येडियुराप्पांची प्रकृती स्थीर
येडियुराप्पा सध्या राजधानी बेंगळुरूमध्ये आहेत. त्यांच्या मणिपाल रुग्णालयात उपचार सुरू आहे. येडियुराप्पा यांच्या कन्येला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर घरातील सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात येडियुरप्पा पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. येडियुराप्पा यांचे वय 78 आहे. त्यामुळं हॉस्पिटलमध्ये त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती हॉस्पिटलकडून देण्यात आली आहे. 

आणखी वाचा - सुशांसिंग रजपूतप्रकरणात बिहार-मुंबई पोलिस आमने-सामने

रोज सापडतात 50 हजार रुग्ण 
देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, आतापर्यंत 18लाखांहून अधिक भारतीयांना कोरोनाची लागण झालीय. देशात गेल्या काही दिवसांपासून रोज 50 हजार कोरोना रुग्ण आढळत आहेत. पण, समाधानाची बाब ही आहे की, आतापर्यंत 10 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत 37 हजारहून अधिकजणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 711 जणांचा मृत्यू झाला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: karnataka cm bs yediyurappa got coronavirus positive