

कर्नाटकात ऊस दरावरून सुरू असलेल्या वादावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तोडगा काढला आहे.
esakal
ठळक निर्णय
कारखान्यांमधील फसवणूक, थकबाकी आणि कमी वसुलीवर कारवाई
केंद्र सरकारकडे साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याची मागणी
ऊस व साखर उद्योगातील सर्वांगीण समस्यांवर स्वतंत्र बैठक लवकरच
Sugarcane Protest News Karnataka : साखर कारखान्यांनी उसाला प्रतिटन ३२५० रुपये द्यावेत तसेच सरकारकडून प्रतिटन अतिरिक्त ५० रुपये अनुदान दिले जाईल, त्यानंतर या उसाचा दर प्रतिटन ३३०० रुपये होईल. हा निर्णय संपूर्ण राज्यभर लागू राहील, असे सरकारतर्फे जाहीर करण्यात आले.