

Bengaluru Youth Coconut Tree Fall Incident
ESakal
कर्नाटकातील बेंगळुरू दक्षिण जिल्ह्यातील रामनगर येथे एका तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. पोलिसांनी आता त्याच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या तरुणाची हत्या त्याच्या मित्रांनीच केली होती. विनोद कुमार (२६) असे मृताचे नाव आहे. विनोद हा मगदीतील कल्याणपूर गावचा रहिवासी होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याचे दोन मित्र सुदीप आणि प्रज्वल यांना अटक केली आहे. हे तिघेही जवळचे मित्र होते. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.