DK Shivakumar : 'मी खूश नाही, आता आमच्या घरी येऊ नका', डीके शिवकुमार यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं

DK Shivakumar and Siddaramaiah News
DK Shivakumar and Siddaramaiah News

Karnataka Election Results : कर्नाटकमध्ये काँग्रेसने भरभरुन यश संपादन केल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच बघायला मिळाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामैय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात शीतयुद्ध बघायला मिळालं. आज डीके शिवकुमार यांनी कार्यकर्त्यांना दम भरल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

बंगळूरु येथे काँग्रेसच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होते. यावेळी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी नुकत्याच मिळालेल्या यशाबद्दल भाष्य केलं आहे. त्यांच्या विधानाने ते समाधानी नाहीत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

DK Shivakumar and Siddaramaiah News
Siddaramaiah : दहशतवादी हल्ल्यात आमचे नेते गेले, भाजपचा एकही नेता…; सिद्धरामय्यांच्या वक्तव्याने खळबळ

डीके म्हणाले की, १३५ जगांवर आपल्याला विजय मिळाला, परंतु मी खूश नाही. माझ्या किंवा सिद्धरामैय्या यांच्या घरी येऊ नका. कारण आमचं पुढचं लक्ष्य लोकसभा निवडणुका आहे. त्यामुळे आपल्याला ताकदीने लढावं लागेल. असं म्हणून त्यांनी चर्चा उडवून दिली आहे.

DK Shivakumar and Siddaramaiah News
Sameer Wankhede : समीर वानखेडे प्रकरणात मोठी अपडेट, NCB चा गंभीर आरोप!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या नेतृत्वामध्ये १० मे रोजी झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठं यश मिळालं. २२४ जागांपैकी १३५ जागांवर काँग्रेसने यश मिळवलं. या विजयाचं श्रेय शिवकुमार यांनाच दिलं जात आहे. तरीही शिवकुमार यांनी आपण खूश नसल्याचं विधान केलं.

बंगळूरु येथील केपीसीसी कार्यालयामध्ये दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ३२ व्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. याचवेळी सिद्धरामैय्या म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवादाविषयी बोलतात. परंतु भाजपच्या कुणीही दहशतवादामुळे आपला जीव गमावला नाही.

मात्र आम्ही इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना गमावलं आहे. वरतून भजपच म्हणतंय की, काँग्रेस आतंकवादाचं समर्थन करत आहे, असं म्हणून त्यांनी भाजपला टोला लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com