Karnataka Election : 'या' बड्या अभिनेत्याच्या पत्नीचा काँग्रेसमध्ये प्रवेश; 'हा' अभिनेता करणार भाजपचा प्रचार

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू आहे.
Kannada actor wife Geetha joins Congress
Kannada actor wife Geetha joins Congressesakal
Summary

'मी या निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करणार आहे. माझे पतीही माझ्यासोबत काही मतदारसंघात प्रचारात सहभागी होतील.'

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू आहे. कन्नड अभिनेता किच्चा सुदीप (Kannada Actor Kiccha Sudeep) भारतीय जनता पक्ष (BJP) आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांच्या समर्थनार्थ प्रचारासाठी निवडणूक रिंगणात उतरला आहे.

तर, दुसरीकडं आज (शुक्रवार) भाजपला निवडणूक प्रचारासाठी कन्नड चित्रपटांमधील आणखी एक सुपरस्टार मिळाला आहे. कन्नड अभिनेता दर्शन थुगुडेपा आगामी निवडणुकांसाठी कर्नाटकातील कोलार आणि बेंगळुरू ग्रामीणमध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रचार करणार आहे.

दरम्यान, याचवेळी लोकप्रिय कन्नड अभिनेता शिवराजकुमार (Kannada Actor Shivarajkumar) यांची पत्नी गीता शिवराजकुमार यांनी 10 मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी आज काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला.

Kannada actor wife Geetha joins Congress
Karnataka Election : भरपावसात भिजत राहुल गांधींनी ठोकलं जबरदस्त भाषण; काँग्रेसला मिळणार 'इतक्या' जागा

कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे (KPCC) अध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या उपस्थितीत त्यांनी बेंगळुरू इथं काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर गीता शिवकुमार म्हणाल्या, 'मी या निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करणार आहे. माझे पतीही माझ्यासोबत काही मतदारसंघात प्रचारात सहभागी होतील.'

Kannada actor wife Geetha joins Congress
Dhananjay Mahadik : 'राजाराम'चा गुलाल उधळल्यानंतर महाडिकांची कर्नाटकात एन्ट्री; 'या' उमेदवाराचा केला प्रचार

ज्येष्ठ राजकारणी आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री दिवंगत एस बंगारप्पा यांची कन्या गीता यांनी भाऊ मधू बंगारप्पा यांच्यासोबत काँग्रेस कार्यालयात गाठलं. गीता यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर आशिवकुमार म्हणाले, 'डॉ. राजकुमार यांची सून अधिकृतपणे काँग्रेसमध्ये सामील झाली आहे. त्यांचा काँग्रेसमध्ये समावेश व्हावा यासाठी मी अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होतो. अखेर आज त्या आमच्यात सामील झाल्या. गीता काँग्रेसमध्ये आल्यामुळं आमच्या पक्षाला फायदा होणार आहे.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com