
सोशल मीडियाद्वारे फेक न्यूज पसरवण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. कर्नाटक सरकार अशा फेक न्यूजला आळा घालण्यासाठी कायदा आणत आहे. त्याबाबत कर्नाटक सरकारचे मंत्री प्रियांक खरगे म्हणाले की, चुकीच्या माहितीच्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे, त्यावर उपाययोजना करण्यासाठी आपण काही महत्त्वाची पावले उचलणे आवश्यक आहे.