'बंगळूर आणखी एका बॉम्बस्फोटाने हादरणार'; 'रामेश्वरम कॅफे'नंतर कर्नाटक सरकारला धमकीचा ई-मेल, पोलिस अलर्ट मोडवर

Karnataka Government Received Threatening Email: बस, ट्रेन, मंदिरे आणि रेस्टॉरंट यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे धमकीच्या ईमेलमध्ये म्हटले आहे.
Karnataka Government Received Threatening Email
Karnataka Government Received Threatening EmailEsakal

Karnataka Government Received Threatening Email: बेंगळुरूमधील ब्रूकफिल्ड भागातील रामेश्वरम कॅफेमध्ये नुकत्याच झालेल्या स्फोटानंतर कर्नाटक सरकारला पुन्हा एकदा बॉम्बची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाला आहे. शनिवारी (9 मार्च) दुपारी 2:48 वाजता बेंगळुरूमध्ये आणखी एक स्फोट होईल, अशी धमकी या ईमेलमध्ये देण्यात आली होती. शाहिद खान नावाच्या व्यक्तीने पाठवलेल्या ईमेलने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सायबर क्राईम पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

बस, ट्रेन, मंदिरे आणि रेस्टॉरंट यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे धमकीच्या ईमेलमध्ये म्हटले आहे. अंबारी उत्सव (कार्निव्हल) सारख्या सार्वजनिक कार्यक्रमादरम्यानही स्फोट होऊ शकतो, असेही या मेलमध्ये लिहिले आहे. ईमेल मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली. खबरदारी घेत पोलिसांनी कर्नाटकात सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. वाहनांची तपासणी केली जात आहे. प्रत्येक कानाकोपऱ्यावर पोलिसांची नजर आहे. इमेलमध्ये आरोपीने शहरातील बॉम्बस्फोटाची घटना रोखण्यासाठी खंडणी मागितली आहे.

Karnataka Government Received Threatening Email
Rameshwaram Cafe Blast : रामेश्वरम कॅफेत बॉम्बस्फोट; चेन्नईतून पाच जणांना अटक, स्फोटामागे कुख्यात दहशतवाद्याचा हात?

बेंगळुरूच्या हायप्रोफाइल ब्रुकफील्ड भागात असलेल्या रामेश्वरम कॅफेमध्ये 1 मार्च रोजी स्फोट झाला होता. येथे मोठ्या संख्येने लोक येतात. कदाचित त्यामुळेच स्फोटासाठी ही जागा निवडण्यात आली असावी. या स्फोटात 10 जण जखमी झाले आहेत. स्फोट होताच आत धुराचे लोट पसरले आणि जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावताना दिसले. सुरुवातीला लोकांना वाटले की कदाचित हा सिलेंडरचा स्फोट असावा, पण जेव्हा पोलिस आणि एनआयएचे पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा संशयाची सुई दुसरीकडे वळली. त्यानंतर हे प्रकरण पूर्णपणे एनआयएकडे सोपवण्यात आले.

या स्फोट प्रकरणात जुनैद आणि सलमान नावाचे दोन दहशतवादी सामील असल्याचा संशय गुप्तचर यंत्रणांना आहे. दोघेही सध्या अझरबैजानमध्ये आहेत. दोघांचे लोकेशन आधी दुबईत सापडले, मात्र नंतर ते तेथून फरार झाले. दोघेही लष्कर मॉड्यूलचे सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे.

Karnataka Government Received Threatening Email
Bengaluru Rameshwaram Cafe Blast: ‘आईचा फोन आला, मी काऊंटरपासून पुढे…’, तितक्यात मोठा स्फोट अन्..., इंजिनिअरने सांगितला भयानक अनुभव

लष्कर मॉड्यूलची भीती लक्षात घेऊन एनआयएच्या पथकाने मंगळवारी पहाटे सात राज्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकले. केंद्रीय तपास यंत्रणा कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूसह सात राज्यांमध्ये 17 ठिकाणांचा शोध घेत आहे. एनआयएच्या आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की, बेंगळुरू सेंट्रल जेलमध्ये असलेला लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी टी-नझीर हिंसक कारवाया करण्यासाठी कैद्यांना कट्टरपंथी बनवत होता.

Karnataka Government Received Threatening Email
Explosion in Bengaluru cafe : बेंगळुरूच्या रामेश्वरम कॅफेमध्ये भीषण स्फोट! पाच लोक गंभीर जखमी

रामेश्वरम कॅफेत बॉम्बस्फोट प्रकरणी चेन्नईतून पाच जणांना अटक

रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाची (Rameshwaram Cafe Blast Case) गंभीर दखल घेत तातडीने कारवाई करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) अधिकाऱ्यांनी चेन्नईच्या अनेक भागात छापे टाकून पाच जणांना अटक केली.

एनआयए अधिकाऱ्यांनी चेन्नईतील (Chennai) सिद्दयाल टाउन आणि बिदरियार मंदिराजवळील काही घरांवर छापे टाकले आणि पाच जणांना अटक केली आणि अज्ञात ठिकाणी त्यांची चौकशी केली. चेन्नईत अटक करण्यात आलेल्या चौघांचे आरटीनगरचा कुख्यात दहशतवादी नझीरशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. अधिक तपास सुरू आहे.

समशुद्दीनच्या घरावर तामिळनाडूतील रामनाथपुरम जिल्ह्यातील किलाकराई भागात छापा टाकला. सध्या परप्पन अग्रहार तुरुंगात असलेला नझीर हा तुरुंगातून कट रचणारा कुख्यात दहशतवादी आहे. पोलिसांनी सय्यद सोहेल, जाहिद, मुदासीर, उमर, फैजल यांना ग्रेनेड, पिस्तूल आणि जिवंत गोळ्यांसह अटक करण्यात आली.

Karnataka Government Received Threatening Email
Bangalore Bomb Blast : रामेश्वरम कॅफेत बॉम्बस्फोट; चार संशयित ताब्यात, महत्त्वाच्या ठिकाणी हाय अॅलर्ट, तपास CBI कडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com