BJP Protest Case : भाजप नेत्यांनी दिल्या 'पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, सुनावणीत नेमकं काय म्हटले?

Pakistan Zindabad Slogan : आंदोलनात काही आंदोलकांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हटल्याचा आरोप होता. आरोपींनी युक्तिवाद केला की ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ म्हणायचे होते, पण जीभ घसरल्याने चुकीने ‘झिंदाबाद’ म्हटले.
Karnataka High Court Quashes Pakistan Zindabad Case

Karnataka High Court Quashes Pakistan Zindabad Case

esakal

Updated on: 

Karnataka High Court Quashes Pakistan Zindabad Case : कर्नाटक उच्च न्यायालयाने भाजपशी संबंधित काही नेत्यांविरुद्ध दाखल करण्यात आलेला फौजदारी गुन्हा रद्द केला आहे. भाजपच्या कार्यक्रमात आंदोलकांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, संबंधित नेत्यांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ म्हणायचे होते, पण जीभ घसरल्याने चुकीने ‘पाकिस्तान झिंदाबाद’ असे शब्द उच्चारले गेले, असा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला. हा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानेही आश्चर्य व्यक्त केले. न्यायमूर्ती व्ही. श्रीशानंद यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद विचारात घेण्याजोगा असल्याचे नमूद करत फौजदारी कार्यवाही रद्द केली.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...